Advertisement

पालिकेचं लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर, १ कोटी लसी करणार आयात

लस आयात करण्यासाठी पालिका सुमारे ७ अब्ज रुपये (९६ मिलियन डॉलर) खर्च करेल.

पालिकेचं लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर, १ कोटी लसी करणार आयात
SHARES

'स्पुतनिक V'ला उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तीन वितरक कंपन्यांनी १ कोटी लस देण्यासाठी निविदा दाखल केल्या आहेत. या जागतिक निविदामध्ये फायझर आणि मॉडर्ना सारख्या जागतिक दर्जाच्या लस उत्पादकांचा देखील समावेश असू शकतो.

महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी बुधवारी एका मुलाखतीत सांगितलं की, मुंबई देशातील पहिलं असं शहर आहे जे स्वतंत्रपणे लसींची आयात करणार आहे. लस आयात करण्यासाठी पालिका सुमारे ७ अब्ज रुपये (९६ मिलियन डॉलर) खर्च करेल.

चहल यांनी सांगितलं की, जर त्यांच्याजवळ दीड कोटी डोस असतील तर ६० दिवसांमध्ये मुंबईतील सर्व लोकांना कोरोना लस दिली जाऊ शकेल. जलद लसीकरणामुळे कोरोनाव्हायरसची तिसरी लाट टाळण्यास मदत होऊ शकते.

आतापर्यंत लंडनस्थित तालिसिन इंटरनेशनल लिमिटेड आणि हैदराबादस्थित दोन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. तिन्ही कंपन्या स्पुतनिकचं अधिकृत वितरक आहेत. चहल यांनी सांगितलं की, मुंबईत १८-४५ वयोगटातील ५० लाखाहून अधिक लोक राहत आहेत, यांच्यासाठी एक कोटी डोस आवश्यक आहेत.

निविदा भरण्याची शेवटची तारीख आधी १८ मे होती, ती २५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निविदा केवळ स्पुतनिकच नव्हे तर इतर अनेक जागतिक लस उत्पादकांसाठीदेखील काढण्यात आल्या आहेत. यात फाइजर, जॉनसन आणि जॉन्सन, सीरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना या जागतिक दर्जाच्या लस उत्पादकांचा देखील समावेश असेल.

मुंबईप्रमाणेच महाराष्ट्र सरकार आंतरराष्ट्रीय बाजारातून ५ कोटी लस डोस खरेदी करेल. राज्य सरकारनेही पुढील ८ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. केंद्रानं लस आयात करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्यानं निविदा काढल्या आहेत. निविदेत काही माहिती मागवण्यात आली आहे.



हेही वाचा

घरी जाऊन लस देण्याची तयारी असेल तर पालिकेला परवानगी देऊ : हायकोर्ट

म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार, राजेश टोपेंची माहिती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा