बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे की. ६० टक्के म्हणजेच ९५ नागरिकांना दुसरा डोस मिळाल्यानंतर ९० दिवसांनी कोविड -19 ची लागण झाली. तथापि, केवळ पाच लसीकरण झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सर्व बरे झाले. पालिकेनं ऑगस्ट महिन्यात केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
परिस्थिती समजून घेण्यासाठी डी वॉर्डद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात मलबार हिल, ग्रँट रोड, चौपाटी, अल्टामाउंट रोड, पेद्दार रोड आणि तारदेव मधील नागरिकांचा समावेश आहे.
विश्लेषणानुसार, गेल्या महिन्यात 'डी' वॉर्डमध्ये कोविड -19 ची एकूण ४६० प्रकरणं नोंदवली गेली. त्यापैकी १५८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले होते. आकडेवारीवरून असं दिसून आलं की ९५ नागरिक म्हणजेच ६० टक्के नागरिकांनी ९० दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती.
पालिका अधिकारी पुढे म्हणाले की, सर्व नागरिक बरे झाले आहेत. आजाराशी संबंधित गुंतागुंतीमुळे केवळ ५ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. तथापि, ते देखील बरे झाले होते.
पालिकेच्या डी वॉर्डचे सहाय्यक महापालिका आयुक्त प्रशांत गायकवाड म्हणाले, “मी माझ्या प्रभागातील परिस्थितीचे आकलन करण्यासाठी हे सर्वेक्षण केलं. एकूणच, सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की लसीकरण केल्याचा फायदा आहे. माझ्या प्रभागातही स्व-चाचणीचा कल आहे. अनेक नागरिक विश्रांतीनंतर प्रवास करत आहेत आणि नंतर स्वत:ची चाचणी घेत आहेत. हे एक प्रकारे लवकर ट्रेसिंग, उपचार आणि प्रसार मर्यादित करण्यास मदत करते.”
शहरात, शनिवारपर्यंत, एकूण १०, ४७९, ४५८ लसीचे डोस देण्यात आले आहेत आणि ३,०६८,७४२ किंवा ३० लाख नागरिकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. कमीतकमी एक डोस लसीकरण झालेल्या नागरिकांची सर्वाधिक संख्या १८ ते ४५ वयोगटातील आहे. ज्यात ४,८८६,१९७ नागरिकांनी किमान एक डोस घेतला आहे.
राज्य कोविड -19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी म्हणाले, “सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे की, लसीकरण मदत करते, म्हणून मी पुन्हा एकदा नागरिकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन करेन. तथापि, आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की, सर्व लसींना सध्या आणीबाणी वापराची मान्यता देण्यात आली आहे आणि येत्या काही महिन्यांत आम्हाला कोविड -१९ शी लढण्यासाठी लसींच्या सुधारित आवृत्त्या मिळतील.”
नायर हॉस्पिटलचे माजी मायक्रोबायोलॉजी प्रोफेसर डॉ.माधव साठे म्हणाले, “कोणतीही लस १००% प्रभावी नाही, कोणतीही लस घ्या. परंतु ज्या व्यक्तीनं दोन्ही डोस घेतले आहेत, त्याला संसर्गाचा त्रास होईल की नाही हे त्या व्यक्तीच्या व्यावसायिक जोखमीसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असेल. जर एखाद्या व्यक्तीला एखादा आजार असेल, त्या व्यक्तीचे वय झाले असेल किंवा जर एखादी व्यक्ती रोग प्रतिकारशक्तीची औषधे घेत असेल, अशा घटकांवर हे अवलंबुन आहे.”
डॉ साठे पुढे म्हणाले, “तथापि, हे स्पष्ट आहे की कोणालाही गंभीर स्वरूपाची कोविड -१९ ची लागण झाली नाही. खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि मृत्यूचं प्रमाण शून्य होतं. हे केवळ लसीकरणामुळे शक्य झालं. तसंच, आणखी एक प्रमुख घटक म्हणजे लसीकरणानंतर कोविड -१९ प्रोटोकॉलचं पालन करणं.
दरम्यान, रविवारी शहरात ३५७ प्रकरणांची नोंद झाली आणि त्यानंतर सात जणांचा मृत्यू झाला. यामुळे प्रकरणांची संख्या 735,055 आणि टोल 16,022 झाली. शहरात 5,244 सक्रिय प्रकरणे आहेत.
हेही वाचा