Advertisement

महापालिका करणार व्यापारी, फेरीवाल्यांची कोरोना चाचणी

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

महापालिका करणार व्यापारी, फेरीवाल्यांची कोरोना चाचणी
SHARES

राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

नुकताच दिवाळीचा सण पार पडला. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भिती आहे. त्यामुळे व्यापारी, फेरीवाले, दुकानदार, हॉटेल कर्मचारी, बेस्ट चालक-वाहक यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 

महापालिका क्षेत्रातील व्यवसायिकांची कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत विविध दुकानदार, दुकानात तसेच हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक यांच्या कोरोना चाचण्या नियमितपणे करण्यात येणार आहेत. या चाचणीदरम्यान बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. तसंच विलगीकरण करणे, समुपदेशन करणे इत्यादी पर्यायदेखील करण्यात येत आहे.

रुग्णालयांनाही दाखल झालेल्या रूग्णांची डिस्चार्ज देण्याआधी कोरोना चाचणी करावी असे महापालिकेने दिले आहेत. याशिवाय पालिकेने कोरोना रुग्ण वाढू नयेत यासाठी झोपडपट्ट्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे.हेही वाचा  -

सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस

टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा