Advertisement

महापालिकेचा किटकनाशक विभाग डेंग्यूसाठी रविवारीही करणार काम


महापालिकेचा किटकनाशक विभाग डेंग्यूसाठी रविवारीही करणार काम
SHARES

मुंबईत मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने अजूनही विश्रांती घेतलेली नाही. अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सर्वांना गरज असली तरच घराबाहेर पडा असा सल्ला दिला आहे.

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे आजारांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यात पावसामुळे जिकडेतिकडे पाणी साचल्याचे प्रकार आपल्याला अजून काही दिवस पाहायला मिळतील. त्यामुळे दक्षता म्हणून मुंबई महापालिकेचा किटकनाशक विभागही सज्ज झाला आहे. डेंग्यू पसरवणाऱ्या इडिस एजिप्ती जातीच्या डासांची उत्पत्ती स्थान नष्ट करण्यासाठी पालिकेनं एक मोहीम हाती घेतली आहे. रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशीही किटकनाशक विभाग काम करणार आहे.

३० नोव्हेंबर पर्यंत आम्ही रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशीही काम करणार आहोत. आम्ही दररोज परिस्थितीचा सर्व रुग्णालयांपासून सर्वांचा आढावा घेत आहोत. यासाठी दोन खास टीम बनवण्यात आल्या आहेत. ज्या वॉर्डमधून जास्त डेंग्यूच्या केसेस आढळत आहेत, तिथे ३-४ भरारी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत.
- राजन नारिंग्रेकर, कीटकनाशक विभाग प्रमुख

याशिवाय आपल्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडणार नाहीत. यासाठी प्रत्येकाने स्वत: काळजी घेतली पाहिजे. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करा असं आवाहनही नारिंग्रेकर यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिलं आहे.

एका भरारी पथकात ५ सदस्य आहेत. एम-पूर्व, इ, जी-दक्षिण, जी-उत्तर, एम-पूर्व, एन-दक्षिण, एच-पूर्व, एफ-दक्षिण, एफ-नॉर्थ आणि एल या वॉर्डमधून जास्त प्रमाणात डेंग्यूच्या केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांनीच स्वच्छता करून काही होणार नाही, सर्वांनीच साथ दिली पाहिजे असंही नारिंग्रेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा