Advertisement

पश्चिम उपनगरात कोरोनामध्ये ३० टक्क्यांची वाढ, 'हे' ५ वॉर्ड ठरत आहेत हॉटस्पॉट

पश्चिम उपनगरातील बोरिवली-विलेपार्ले पट्ट्यातील तब्बल पाच वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

पश्चिम उपनगरात कोरोनामध्ये ३० टक्क्यांची वाढ, 'हे' ५ वॉर्ड ठरत आहेत हॉटस्पॉट
(Representational Image)
SHARES

पश्चिम उपनगरातील बोरिवली-विलेपार्ले पट्ट्यातील तब्बल पाच वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहराच्या एकूण सक्रिय प्रकरणांपैकी ३२ टक्के COVID 19 ची रुग्ण या भागात सापडत आहेत. म्हणून हे भाग हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं २४ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण ८ हजार ३२० रुग्ण सक्रिय आहेत.

२४ प्रशासकीय प्रभागांपैकी बोरिवली, गोराई आणि मगठाणे या क्षेत्रांचा समावेश असलेल्या R- Central मध्ये ६०१ सक्रिय रुग्णांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर K-west मध्ये अंधेरी वेस्ट, विलेपार्ले वेस्ट आणि जुहूमध्ये ३३३ रुग्ण आहेत.

पहिल्या पाच यादीत R- south (कांदिवली, चारकोप, पोयसर) मधील ५११, पी-उत्तर (मालाड पूर्व आणि पश्चिम) ५०७ आणि के-पूर्व (अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी ई) ५०२ अशा ५ प्रभागांची नावं आहेत.

याउलट दक्षिण मुंबई भागातील प्रभागात ब (डोंगरी), सी (काळबादेवी, भुलेश्वर आणि मरीन लाइन्स) आणि ए (चर्चगेट, कुलाबा, कफ परेड आणि नरिमन पॉईंट) मध्ये सक्रिय कोरोनाव्हायरसची प्रकरणे सर्वात कमी आहेत. बी प्रभागात ६० सक्रिय प्रकरणं आहेत, सी प्रभागात १०९ आणि ए वार्ड २०१ आहेत.

तथापि, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एओ वॉर्डमध्ये कोलाबा, कफ परेड आणि चर्चगेट या भागांमध्ये कोविड घटनांमध्ये ९१ टक्के वाढ झाली. आर-उत्तर (दहिसर आणि बोरिवली) मध्ये ५० टक्के, ई (भायखळा आणि मुंबई मध्य) ५८ टक्के, एफ-दक्षिण (परळ आणि शिवडी) ५२ टक्के आणि एम-पूर्व (गोवंडी) ५१ टक्के नोंद झाली आहे.

प्रशासकिय अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक वाढत्या चाचण्यांना कोरोनाचे आकडे वाढण्यास कारणीभूत ठरवत आहेत. तसंच यापैकी बहुतांश घटना झोपडपट्टी नसलेल्या भागातील असल्याचं देखील त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.हेही वाचा

शरद पवारांनींही घेतली कोरोना प्रतिबंधक लस

मुंबईत पुन्हा 'झिरो कोरोना' मिशन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा