डाॅ. अश्विन सावंत लिखित "मधुमेह विरुद्ध आपण"चं रविवारी प्रकाशन

 Mumbai
डाॅ. अश्विन सावंत लिखित "मधुमेह विरुद्ध आपण"चं रविवारी प्रकाशन

मुंबई - आयुर्वेदाचे अभ्यासक डाॅ. अश्विन सावंत यांनी लिहिलेल्या "मधुमेह विरुद्ध आपण" या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी 26 फेब्रुवारीला होणार आहे. मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळ सभागृहात सायंकाळी 4 वा हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. डॉ. संजय ओक यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. "मधुमेह विरुद्ध आपण" या पुस्तकात डाॅ. अश्विन सावंत यांनी मधुमेहाशी संबंधित पैलूंची माहिती अत्यंत सोप्या भाषेत करुन दिली आहे, अशी माहिती या पुस्तकाचे प्रकाशक, नवता बुक वर्ल्डचे संचालक कीर्तिकुमार शिंदे यांनी दिली. या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या माजी प्रमुख डाॅ. गौरी माहुलीकर, मुलुंड मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के, आयुर्विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. आशानंद सावंत तसंच डाॅ. सुचेता सावंत उपस्थित राहणार आहेत.

Loading Comments