Advertisement

पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना ब्रेस्ट कॅन्सर स्वपरिक्षणाचे धडे


पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना ब्रेस्ट कॅन्सर स्वपरिक्षणाचे धडे
SHARES

ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृतीसाठीचा महिना म्हणून ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर जसलोक हॉस्पिटलतर्फे महिला कर्मचाऱ्यांना स्वपरिक्षणाचे धडे देण्यात आले. पालिकेच्या डी वॉर्ड मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याला महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतात 2020 पर्यंत ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णांमध्ये 17,97,900 इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच, नुकत्याच दिलेल्या काही आकड्यांनुसार 50 पेक्षा कमी वय असलेल्या महिलांमध्ये हा कॅन्सर आढळतो. बहुतेकदा महिलांना या कॅन्सरची लागण झालेली कळतही नाही. अशावेळी जर महिलांनी महिन्यातून एकदा स्वत: परिक्षण करून पाहणं आणि बदल आढळल्यास लवकरात लवकर यावर उपचार होणं शक्य असतं.



शिवाय, अनेक डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासानुसार तरूण वयातही ब्रेस्ट कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत. गर्भनिरोधक गोळ्या, मासिक पाळीत होणारे बदल, अनुवांशिकता अशी अनेक कारणे ब्रेस्ट कॅन्सरसाठी जबाबदार असतात.

महिलांनी खरंतर एकदा तरी स्वत:चं परीक्षण केलं पाहिजे. परीक्षणानंतर न थांबता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करणे गरजेचे आहे.

डॉ. रितु जैन, जसलोक हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट

या प्रशिक्षणासाठी बीएमसी सी आणि डी वॉर्ड कमिटीच्या चेअरपर्सन ज्योत्स्ना मेहता याही उपस्थित होत्या. या प्रशिक्षणानंतर मेहता यांनी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती असणे गरजेचे आहे, तसंच भविष्यातही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले.



हेही वाचा

ब्रेस्ट कॅन्सरपासून कसा कराल बचाव?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा