ब्रेस्ट कँसरपासून कसा कराल बचाव?


  • ब्रेस्ट कँसरपासून कसा कराल बचाव?
SHARE

सीएसटी - स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) हा महिलांना काळजीत टाकणारा आजार. सद्यस्थितीत औषधोपचार आणि इतर पद्धतीने ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा होत असला, तरी या औषधोपचारांमध्ये केमोथेरपीचा समावेश अधिकवेळा असतोच. केमोथेरपीची अनेकांना भीती वाटते. पण सुरुवातीच्या टप्प्यातच ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले तर त्या रुग्णावर केमोथेरपी करण्याची गरज कमी असते, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. केमोथेरपीशिवाय इतर उपचारांनाही हा आजार बरा केला जाऊ शकतो. 

कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू किंवा सिगारेट. या प्रमुख दोन कारणामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो असे सांगतात पण या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहे. जंक फुड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करोगाला कारणीभूत आहेत.
कर्करोगाबद्दल दुर्दैवी बाब म्हणजे या रोगाचे निदान व्हायला उशीर लागतो. ब-याच रुग्णालयाच्या बाबतीत कर्करोगाच्या दुस-या किंवा तिस-या टप्प्यात या रोगाचे निदान झाल्याचे देखील समजते. कर्करोगाची काही लक्षणे आहेत जी लक्षणे तुम्हाला आढळली तर याचे योग्य वेळी निदान करून त्यावर वेळीच उपाय करू शकता.
कर्करोगाची लक्षणे
– स्तनात किंवा शरीरातील काही भागत गाठी तयार होणे.
– खोकला किंवा सतत घसा दुखणे
– दिर्घ काळापासूनची दुख
– तोंडातली बरी न होणारी जखम
– अन्न गिळताना त्रास होणे
– अचानक आवाजात बदल होणे
– लघवी किंवा मलातून रक्तस्त्राव होणे

संबंधित विषय
ताज्या बातम्या