Advertisement

नोटा पसरवू शकतात कोरोना व्हायरस, WHO नं दिला इशारा

आपण वापरत असलेल्या नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत तो पसरू शकतो.

नोटा पसरवू शकतात कोरोना व्हायरस, WHO नं दिला इशारा
SHARES

कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, म्हणून प्रत्येक जण योग्य ती काळजी घेत असेलच यात काही शंका नाही. मात्र तरीही तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे. आपण वापरत असलेल्या नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत तो पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. त्यामुळे भारतात कॉन्टॅक्टलेस ट्रान्झक्शेनवर भर द्यावा, अशी सूचना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (CAIT) केंद्र सरकारला केली आहे.


काय म्हटलं पत्रात?

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनी (CAIT) केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा धोका पाहता करन्सी नोट्सऐवजी कॉन्टॅक्टलेस ट्रान्झेक्शन, डिजीटल ट्रान्झेक्शन वाढवण्यावर जोर देण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय प्लास्टिक नोट्सबाबतही विचार करण्यास सांगितलं आहे. CAIT नं अर्थमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये कोरोनाव्हायरसबाबतचे स्टडीज आणि मीडिया रिपोर्टचा हवाला दिला आहे.


नोटांमार्फत संसर्ग पसरतो

करन्सी नोट्सवर मायक्रो-ऑर्गेनिज्म असतात, ज्यामुळे संसर्ग झपाट्यानं पसरतो. नोटांमार्फत कित्येक प्रकारचे संसर्ग पसरतात, याबाबत तज्ज्ञांनीही सावध केलं आहे. यामुळे युरिनरी, श्वसनाच्या समस्या, स्किन इन्फेक्शन यासारखे आजार पसरण्याचा धोका वाढतो.


असा पसरतो संसर्ग

CAIT चे सेक्रेटरी जनरल प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं की, 'ट्रेडिंग कम्युनिटीमध्येच करन्सीचा सर्वात जास्त वापर केला जातो. एखादी नोट एका हातातून दुसऱ्या हातात वारंवार ट्रान्सफर होत असते. यामुळे नोट दूषित होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. भारतात सर्वाधिक लोकं पैसे मोजताना तोंडात बोटं घालून थुंकीनं ओलं करून मोजतात. ज्यामुळे कोणताही व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो'


पॉलिमर नोटांचा पर्याय

यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या देशांनी पॉलिमर नोटांचा वापर सुरू केला आहे, जेणेकरून व्हायरसचं संक्रमण जास्त होणार नाही. भारतानंही अशाच पॉलिमर नोटांसारखा पर्याय शोधावा, असंही CAIT ने केंद्र सरकारला सुचवलं आहे.



हेही वाचा

Coronavirus Update: करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महापालिका घेणार खासगी रुग्णालयांची मदत

करोनाच्या भितीने चिकन किलोला १० रुपयांवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा