Advertisement

मॅरुआनाचा वैद्यकीय उपचारासांठी वापर?


मॅरुआनाचा वैद्यकीय उपचारासांठी वापर?
SHARES

मुंबईत गांजासारखे बरेच व्यसनजन्य पदार्थ अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतात. पण, आता कर्करोगाच्या किमोथेरेपीनंतर होणाऱ्या दुखण्यावरही 'मॅरुआना' हे ड्रग्ज औषध म्हणून घेऊ शकतो, असं काही कर्करोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. मॅरुआनाच्या पानांपासून गांजा तयार केला जातो. या ड्रगच्या अतिसेवनामुळे व्यसन लागण्याचीही शक्यता आहे. पण, मॅरुआनामध्ये असलेल्या दोन घटकांमुळे कर्करोगावरील किमोथेरेपी केल्यानंतर नसांचं दुखणं कमी होऊ शकतं, असं काही कर्करोगतज्ज्ञांचं मत आहे. तसंच, जगभरातील अनेक देशांमध्ये मॅरुआनाचा वापर वैद्यकीय उपचारांसाठी केला जातो, असंही काही कर्करोगतज्ज्ञांनी सांगितलं आहे.


मनेका गांधी यांनी केली मागणी

केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मनेका गांधी यांनी ‘मॅरुआना’ या ड्रग्जला भारतात कायदेशीर मान्यता देऊन त्याचा वापर वैद्यकीय कारणांसाठी करावा, अशी मागणी केली आहे. तसंच, मॅरुआनाचा वापर कर्करोग किंवा त्यासारख्या आजारात रुग्णांसाठी करण्यात यावा, असंही त्यांनी सुचवलं आहे.

मॅरुआनाचा वापर काही देशांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी केला जातो. या ड्रग्जला 'सायको अॅक्टिव्ह किंवा आनंदामाईड' असंही म्हणतात. या ड्रगमुळे रुग्णाला होणाऱ्या वेदना किंवा त्याला होणाऱ्या दु:खाचा विसर पडण्यास मदत होते. त्यामुळे त्यांनी दिल्लीत या ड्रगचा वापर कर्करोगाच्या उपचारांसाठी करावा, अशी मागणी केली आहे.


मॅरुआनामध्ये 4 ते 5 घटक आहेत, ज्यातील दोन घटकांमुळे नसांचं दुखणं कमी होऊ शकतं. आम्ही आतापर्यंत किमोथेरेपी झाली की त्या रुग्णाला त्याच्या वेदना कमी होण्यासाठी मोर्फिन ही औषध देत आहोत. ज्याने रुग्णाच्या थोड्याप्रमाणात वेदना कमी होतात. पण, जर भविष्यात कधी मॅरुआना हा ड्रग द्यायचं ठरवलं तर त्याची रुग्णालयात उपयुक्तता किती आहे आणि कोणत्या रुग्णाला ते द्यायचे याचा देखील विचार करायला पाहिजे. 

डॉ. परमानंद जैन, विभागीय प्रमुख, पेन डिपार्टमेंट, टाटा रुग्णालय

जेव्हा एखाद्या रुग्णाला कर्करोग होतो तेव्हा त्याच्यावर किमोथेरेपी ही ट्रीटमेंट केली जाते. त्या ट्रीटमेंटनंतर त्या रुग्णाला होणाऱ्या वेदना या असह्य असतात. त्यामुळे 'मॉर्फिन' हे औषध दिल्यानंतर थोड्या प्रमाणात त्यांच्या वेदना कमी होतात. पण, भारतात जवळपास 15 लाख लोकांना कर्करोगाचा आजार आहे. अशावेळी रुग्णालयात मॉर्फिन या औषधाचा ही तुटवडा निर्माण होतो. मग आपण अशावेळी 'मॅरुआना' हे ड्रग कस काय पुरवणार? असा सवाल ही डॉ. जैन यांनी केला आहे. फक्त 1 टक्के लोकांनांच मॉर्फिन हे औषध पुरवले जाते, हे वास्तव ही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना समोर आणलं आहे.

तर, याविषयी मानसोपचारतज्ज्ञ हेमंत बेलसरे म्हणतात की, “मॅरुआना हे ड्रग जर वैद्यकीय वापरासाठी येणार असेल, तर ते रुग्णांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असेल. कारण, ड्रग हा प्रकार रुग्ण आपलं दु:ख विसरण्यासाठीच घेत असतो. फक्त याचा वापर जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केला, तर मग त्याचं व्यसन लागू शकतं. पण, जे रुग्ण मानसिक आजाराने त्रस्त असतात, अशा रुग्णांना जर मॅरुआना दिलं, तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.


गांजासारखे व्यसनजन्य पदार्थ मुंबईत कुठेही उपलब्ध होतात. पण, त्याचं व्यसन लागून आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जर मॅरुआनाचा वापर केला, तर त्यामुळे ड्रग अॅडिक्शन होण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढेल. परदेशात जर एखाद्या रुग्णाला मॅरुआना दिलं, तर तो रुग्ण त्या डॉक्टरकडे पुन्हा फॉलोअपसाठी येतो. पण, आपल्या मुंबईत तसं होईलच असं नाही.

नुतन लोहिया, मानसोपचारतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल


मॅरुआना या ड्रगचा किमोथेरेपीच्या उपचारांसाठी फायदा होऊ शकतो. पण, मॅरुआनापासून बनवलेल्या गोळ्या किंवा औषध कोण देणार?म्हणजे मानसोपचारतज्ज्ञ देणार की कर्करोगतज्ज्ञ देणार? हे देखील पहावं लागेल. किमोथेरेपीच्या उपचारांनंतर होणाऱ्या उलट्यांना प्रतिबंध करण्यासाठी या ड्रगचा वापर केला जातो.

डॉ. सागर करिया, सेक्रेटरी, बॉम्बे सायकॅट्रिस्ट असोसिएशन

किमोथेरेपी झालेल्या रुग्णाला दिवसातून 3 ते 4 वेळा मॉर्फिन हे औषध घ्यावं लागतं. तसंच जर ती व्यक्ती लांबून उपचारासाठी येत असेल, तर त्या व्यक्तीला 10 दिवसांसाठी जवळपास 100 गोळ्या पुरवल्या जातात. त्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात मॅरुआना उपलब्ध करता येईल का? याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.


मुंबईत ड्रग्जचं व्यसन असणारी मंडळी कमी नाहीत. त्यात जर मॅरुआनाचा वापर आपण वैद्यकीय उपचार पद्धतीत करणार असू, तर मग ड्रग सेवन करणाऱ्या लोकांना आणखी बळ येईल. त्यामुळे खूप जाणीवपूर्वक आणि सुरक्षितपणे याचा वापर केला पाहिजे. पण, जर या ड्रगच्या वापराची माहिती लोकांपर्यंत योग्य रितीने पोहोचली नाही, तर त्यामुळे नक्कीच हानी होऊ शकते.

डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन



हेही वाचा

म्युझिक थेरेपी करेल कर्करोगावर मात - ब्रेट ली


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा