Advertisement

घरी जाऊन लस देण्याची तयारी असेल तर पालिकेला परवानगी देऊ : हायकोर्ट

पालिकेची (BMC) तयारी असेल तर आम्ही परवानगी देऊ, असं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे.

घरी जाऊन लस देण्याची तयारी असेल तर पालिकेला परवानगी देऊ : हायकोर्ट
SHARES

सध्या कोरोना लस घेण्यासाठी कोरोना लसीकरण (Corona vaccination) केंद्रावर जावं लागतं. पण काही विशिष्ट नागरिकांना घरीच कोरोना लस देण्याचा विचार केला जात होता. पण केंद्राकडून अद्याप मंजूरी मिळाली नाही. पण पालिकेची (BMC) तयारी असेल तर आम्ही परवानगी देऊ, असं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे.

जर ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि अंथरूणाला खिळलेल्या, व्हिलचेअरवर असलेल्या व्यक्ती ज्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं शक्य नाही, त्यांना घरी जाऊन योग्य आरोग्य सुविधांसह कोरोना लस देणं शक्य असेल तर गुरुवारी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे निर्देश कोर्टाने महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना दिले आहेत. गुरुवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे.

कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्ती यांना कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येऊ शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना घरी जाऊन कोरोना लस द्यावी, असं मुंबई उच्च न्यायलायने सांगितलं आहे. जर मुंबई महापालिकेची (BMC) यासाठी तयारी असेल तर मुंबई हायकोर्ट यासाठी परवानगी देईल, असंही कोर्टानं सांगितलं आहे.

हायकोर्टाने याआधी केंद्रालाही दारोदारी लसीकरण मोहीम राबवण्याबाबत विचारणा केली होती. पण केंद्र सरकार दारोदारी लसीकरण मोहीम राबवण्याच्या तयारीत नाही. जर पालिकेला अशी लसीकरण मोहीम करायची असेल तर आम्ही परवानगी देऊ, केंद्र सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. असं कोर्टानं बुधवारी दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे.



हेही वाचा

म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार, राजेश टोपेंची माहिती

पावसाळ्यापूर्वी महापालिका 'या' जम्बो COVID केंद्रांची दुरुस्ती करेल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा