Advertisement

पावसाळ्यापूर्वी महापालिका 'या' जम्बो COVID केंद्रांची दुरुस्ती करेल

मुंबईतील आगामी पावसाळी हंगामाच्या तयारीच्या भाग म्हणून हे केलं जात आहे.

पावसाळ्यापूर्वी महापालिका 'या' जम्बो COVID केंद्रांची दुरुस्ती करेल
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) येत्या १५ दिवसांत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), दहिसर आणि मुलुंड इथल्या जंबो केअर सेंटरमध्ये स्ट्रक्चरल दुरुस्ती करणार आहे. मुंबईतील आगामी पावसाळी हंगामाच्या तयारीच्या भाग म्हणून हे केलं जात आहे.

अतिरिक्त नगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह कोविड केंद्रांना आवश्यक साधनं पुरवणार्‍या सर्व सहा जंबो कोविड केंद्रांचे डीन आणि नऊ विभाग यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जयस्वाल यांना जंबो कोविड ट्रीटमेंट सुविधांच्या निर्मितीचे काम सोपवण्यात आलं आहे.

“या केंद्रांच्या संरचनात्मक स्थिरतेबरोबरच एसी, स्वच्छतागृहे, फरशी, नाले आणि पाणी जोडण्यांची दुरुस्ती करण्यासह प्रशासकिय कामं हाती घेण्यात येतील. अग्निशामक आणि इलेक्ट्रिकल ऑडिट केलं जाईल आणि अधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, ”ते म्हणाले.

“या सुविधा गेल्या एक वर्षापासून कार्यरत असल्यानं मजबुतीकरणाचे काम करणं आवश्यक आहे,” जयस्वाल म्हणाले की, दुरुस्तीदरम्यान बीकेसी केंद्र नवीन रूग्णांना प्रवेश देणार नाही, तरीही ही लसीकरण सुरू ठेवेल.

“लसीकरण केंद्र मुलुंड जंबो केंद्रातून हलवण्यात आले असून दहिसर इथल्या केंद्राचे स्थानही बदललं जात आहे,” ते पुढे म्हणाले.

६ जंबो केंद्रांचे लेखापरीक्षण अहवाल सादर करणे बाकी असले तरी, बैठकीत अधिकारी वर्गाच्या एनएससीआय, गोरेगावमधील नेस्को आणि बीकेसीतील केंद्रांव्यतिरिक्त भायखळा इथल्या केंद्रावरही दुरुस्तीची कामे केली जातील असा निष्कर्ष काढला.



हेही वाचा

कोरोनामुक्त रुग्ण, स्तनपान करणाऱ्या महिलाही लस घेऊ शकतात, नव्या गाईडलाईन्स जारी

वाशीतील कोरोना केंद्रात तणावमुक्तीसाठी ग्रंथालय, पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा