Advertisement

कोरोनामुक्त रुग्ण, स्तनपान करणाऱ्या महिलाही लस घेऊ शकतात, नव्या गाईडलाईन्स जारी

कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या व्यक्तीने कोरोनाची लस कधी घ्यावी? स्तनपान करणाऱ्या महिला लस घेऊ शकतात का? असे अनेक प्रश्न सातत्यानं विचारले जात आहेत.

कोरोनामुक्त रुग्ण, स्तनपान करणाऱ्या महिलाही लस घेऊ शकतात, नव्या गाईडलाईन्स जारी
SHARES

कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या व्यक्तीने कोरोनाची लस कधी घ्यावी? स्तनपान करणाऱ्या महिला लस घेऊ शकतात का? असे अनेक प्रश्न सातत्यानं विचारले जात आहेत. त्यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर आता तुम्ही ३ महिन्यांनी लस टोचून घेऊ शकतात. कारण NEGVAC अर्थात (National Expert Group on Vaccine Administration for COVID-19)ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

NEGVAC ने केलेल्या सूचनांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला ३ महिन्यांनी कोरोना लस द्यावी असं सांगण्यात आलं होतं. त्यांची ही सूचना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. NEGVAC ने केलेल्या सूचनानंतर एखादा व्यक्तीला कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर त्याने कोरोनामुक्त झाल्यानंतर 3 महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा. त्याचबरोबर आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोनाची लस दिली जावी असं NEGVAC ने म्हटलं. तसंच कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

लसीकरणाबाबत NEGVACच्या ४ सूचनांना मंजुरी

  • कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला ३ महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते
  • कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर ३ महिन्यांना दुसरा डोस घ्यावा.
  • आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.
  • कोरोना लस घेण्यापूर्वी रॅपिड एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नाही.

दरम्यान, नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन (NTAGI)कडूनही काही दिवसांपूर्वी एक शिफारस करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कोविड१९ बाधित रुग्णांनी बरे झाल्यानंतर ६ महिन्यांनी कोरोना लस घ्यावी, अशी सूचना या तज्ज्ञांच्या गटाने केलीय. त्याचबरोबर गर्भवती महिलांना कोणतीही लस घेण्याचा पर्याय द्यायला हवा असंही सुचवण्यात आलंय. स्‍तनपान करणाऱ्या महिलांना प्रसुतीनंतर केव्हाही लस देता येईल, असंही सांगण्यात आलं होतं.

त्यानंतर NIAGI मंगळवारीही एक सूचना करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी ६ ते ९ महिन्याचं अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी NIAGI ने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी ६ महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी असं सांगण्यात आलं होतं. पण आता हे अंतर ९ महिन्यापर्यंत वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



हेही वाचा -

मुंबई महापालिकेत विविध पदांच्या १८५ जागांसाठी भरती

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा