Advertisement

मुंबई महापालिकेत विविध पदांच्या १८५ जागांसाठी भरती

भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

मुंबई महापालिकेत विविध पदांच्या १८५ जागांसाठी भरती
SHARES

मुंबई महापालिकेमध्ये विविध पदांच्या १८५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२१ आहे.

एकूण जागा : १८५

पदाचं नाव आणि शैक्षणिक पात्रता 

१) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician - ८९

शैक्षणिक पात्रता : १) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc)पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (MSBTE) ची / डी.एम.एल.टी (D.M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc.+ D.M.L.T.)

किंवा उमेदवाराने १२ वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमधील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा. 

२) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान ५० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

२) औषधनिर्माता/ Pharmacist - ९६

शैक्षणिक पात्रता :  १) उमेदवाराकडे राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे. (पदवीस प्राधान्य देण्यात येईल.) ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा.

वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ६५ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,००० रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते , एफ /दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२.

अधिकृत संकेतस्थळ : 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :

१ : येथे क्लिक करा

२ : येथे क्लिक करा



हेही वाचा - 

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा