Advertisement

कोरोना संदर्भात अफवा पसरवताय? होऊ शकते शिक्षा

कोरोना व्हारस हा चिकन खाल्ल्यामुळे होतो असे मेसेजेस काही दिवस सोशल मीडियावर केले जात होते. पण यात किती तथ्य आहे? जाणून घ्या...

कोरोना संदर्भात अफवा पसरवताय? होऊ शकते शिक्षा
SHARES

चिकन खाल्यामुळे कोरोनोव्हायरस होतो अशी अफवा गेले काही दिवस सोशल मीडियावर पसरवली गेली. या अफवांची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारच्यावतीनं सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल केला आहे.


म्हणून गुन्हा दाखल 

कोरोना व्हारस हा चिकन खाल्ल्यामुळे होतो असे मेसेजेस काही दिवस सोशल मीडियावर केले जात होते. यामध्ये किती तथ्य आहे हे जाणून न घेता युजर्सनी हे शेअर केले. अशी ही अफवा सर्वत्र पसरली. पण यामुळे पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालं. याच कारणामुळे गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.


सोशल मीडियावर अफवा

चीनच्या (China) वुहानमधून (Wuhan) जगभरात हातपाय पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धसका संपूर्ण जगानं घेतला आहे. भारतातल्या लोकांनी तर अगदी चिकन (Chicken), अंडी (Eggs) खाणंही सोडून दिलं होतं. त्यामुळे पोल्ट्री फार्म आणि शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला होता. चिकन खाल्ल्यानं कोरोनाव्हायरस होतो, असं बरेच मेसेज सोशल मीडियावरही फिरत होते. त्यामुळे तुमच्या ताटात चिकन किंवा अंडं आलं तर त्यावर ताव मारण्याआधी आपल्याला कोरोनाव्हायरस तर होणार नाही, असा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. पण ही फक्त एक अफवा असल्याचं समोर आलं आहे.


चिकनमुळे कोरोना होत नाही

चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. खुद्द केंद्र सरकारनं याची पुष्टी दिली आहे. चिकन, अंडी खाल्ल्यानं कोरोनाव्हायरस होत नाही, असं केंद्रीय पशुपालन मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं होतं की, 'चिकन खाल्ल्यानं कोरोनाव्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.'


पोर्ल्टी उत्पादक अडचणीत

गिरीराज सिंह यांनी पोल्ट्री उत्पादक आणि नागरिकांना या सूचना देण्याचे निर्देश दिले होते. तसंच जर कोणालाही काहीही शंका असतील तर पशुपालन विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. देशातील कृषी आधारित उद्योग समूह आयबी ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी पशुपालन मंत्री गिरीराज सिंग यांची भेट घेतली. त्याचवेळी पशुपालन मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं होतं

त्यामुळे आता काही टेंशन न घेता किंवा काही विचार न करता चिकन बिनधास्त खा. हेही वाचा

कोरोनामुळे भारतीय बाजारपेठ आजारी, टिव्ही, फ्रिज आणि मोबाईल महागणार

कोरोना व्हायरसचा फटका पाम तेलाला, आवक थांबली

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा