Advertisement

कोरोना व्हायरसचा फटका पाम तेलाला, आवक थांबली

कोरोना व्हायरसचा फटका पाम तेलाला (Palm Oil) बसला आहे.

कोरोना व्हायरसचा फटका पाम तेलाला, आवक थांबली
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोना व्हायरसच्या (Corona virus) प्रकरणामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. अशातच आता या कोरोना व्हायरसचा फटका पाम तेलाला (Palm Oil) बसला आहे. इंडोनेशियातील (Indonesia) पाम तेलाची आयात पूर्णपणे थांबली आहे. मुंबईसह भारताताल एकूण मागणीपैकी ७० टक्के वापर पाम तेलाचा होतो. हॉटेल्स, रेस्तरां, फरसाण मार्ट आदी सारेच या तेलाचा वापर करतात. भारताला लागणाऱ्या एकूण पाम तेलापैकी ७५ ते ८० टक्के तेल मलेशियाहून (Malaysia) आयात केले जाते.

पाम तेलाची (Palm Oil) आयत थांबली असता, सरकीच्या तेलबियांचं मुबलक उत्पादन झालं आहे. त्यामुळं हे तेल पाम तेलाला पर्याय ठरलं आहे. दरम्यान, तेलाचे दर स्थिर असले, तरी कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात न आल्यास महिनाभरात तेलाचे दर वधारण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government) आदेशानं ती आयात व्यापाऱ्यांनी बंद केली आहे. त्याचवेळी इंडोनेशियाचा (Indonesia) पर्याय होता. पण, कोरोना व्हायरस (Corona virus) प्रकरणामुळं इंडोनेशियातील आवकही ठप्प झाली आहे. कोरोनामुळं इंडोनेशियाहून येणारे हजारो टन तेल व तेलबियांचं कंटेनर तेथील बंदरांवरच थांबविण्यात आले आहेत. यामुळं देशात पाम तेलासह एकूण सर्वच खाद्यतेलांची तूट निर्माण होण्याची भीती होती. मात्र, सरकीच्या तेलामुळं ही दरवाढ सध्यातरी टळण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात व मध्यप्रदेशातील सरकीच्या तेलबियांची आवक सुरू होते. दरवर्षी साधारण ६० ते ८० लाख टन तेलबिया देशात तयार होतात. त्यापैकी जवळपास ८० टक्के बिया जानेवारी महिन्यात येऊन त्याचं तेल तयार होतं. ते तेल आता बाजारात येऊ लागले आहे. त्यामुळं पामतेल किरकोळ बाजारात ९० ते ९२ रुपये लिटरवर स्थिर झाले आहे. त्याचवेळी सरकीचे तेल ८८ ते ९० रुपये लिटरनं उपलब्ध झालं आहे. त्यामुळंच खाद्यतेलाचे दर बऱ्यापैकी स्थिर राहू शकले आहे.

तेलाचे दर

तेलाचा          प्रकार मागील          महिन्यात सध्या

पाम तेल         ८९-९१               ९०-९२

सूर्यफुल          १००-१०२           १०२-१०५

व्हेजिटेबल तेल    ९५-९८              १००

शेंगदाणा         ११५-१५५            १२०-१५५

सरकीचे तेल       ८६-८८              ८८-९०हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर लवकरच फास्टॅग यंत्रणा कार्यरत होणार

मुंबईत येतंय पहिलं रो-रो जहाजसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा