Advertisement

सॅनिटायझर, मास्क आता ‘इतक्या’ रुपयांना मिळेल, केंद्राने निश्चित केल्या किंमती

काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती निश्चित केल्या आहेत. या किंमतीपेक्षा जास्त दराने कुणी या दोन्ही वस्तूंची विक्री करताना आढळल्यास त्याला कारवाईला सामोरं जाव लागेल.

सॅनिटायझर, मास्क आता ‘इतक्या’ रुपयांना मिळेल, केंद्राने निश्चित केल्या किंमती
SHARES

कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग होऊ लागताच नागरिकांनी सर्वात पहिल्यांदा धाव घेतली, तरी मेडिकल स्टोअर्सकडे. मास्क आणि सॅनिटायझरच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात या वस्तूंची कमतरता भासू लागली, तर दुसरीकडे या वस्तूंच्या किंमतीही वाढल्या, या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती निश्चित केल्या आहेत. या किंमतीपेक्षा जास्त दराने कुणी या दोन्ही वस्तूंची विक्री करताना आढळल्यास त्याला कारवाईला सामोरं जाव लागेल.

हेही वाचा- Coronavirus Updates: घर, आॅफिसमधील एसी बंद ठेवा, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव (COVID - 19) रोखायचा असेल, तरी आपले हात स्वच्छ ठेवण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहेत. शिवाय अनेकजण खबरदारीचा उपाय म्हणून हवेतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तोंडाला मास्क लावत आहेत. या दोन वस्तू घेण्यासाठी मेडिकल दुकानांमध्ये गर्दी उसळली असल्याने काही दुकानदार या वस्तूंचा काळाबाजार करत असल्याचं पुढं आलं आहे.

हे प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचं पाऊल टाकलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान (ram vilas paswan) यांनी, ट्विटर अकाऊंटवरुन, मास्क आणि सॅनिटायजरच्या किमती केंद्र सरकारने निश्चित केल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये मास्कसाठी ८ ते १० रुपये आणि सॅनिटायजरच्या २०० मि.ली बाटलीची किंमत ही १०० रुपये असेल असं पासवान यांनी जाहीर केलं आहे.

हेही वाचा- Coronavirus Updates: कोरोनाचे नवीन 11 रुग्ण आढळले, एकूण आकडा 63 वर

कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर फेस मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या (Face mask, hand sanitizer) दरांमध्ये कमालीची वाढ झाली. हा प्रकार गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने या वस्तूंच्या किंमती निश्चित केल्या आहेत. आवश्यक वस्तू अधिनियमनानुसार २ आणि ३ आवरणाचं मास्क बनवण्यासाठी आवश्यक सामुग्रीच्या किंमती १२ फेब्रुवारी २०२० रोजी होत्या तेवढ्याच राहतील. २ आवरणाच्या मास्कची किंमत घाऊक बाजारात प्रति मास्क ८ रुपये आणि ३ आवरणाच्या मास्कची किंमत प्रति मास्क १० रुपयांपेक्षा अधिक नसेल. 


तर हँड सॅनिटायझरच्या २०० मी. लिटरच्या बाटलीची  १०० रुपयांपेक्षा अधिक नसेल. या किंमती ३० जून २०२० पर्यंत कायम असतील, असं पासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा