Advertisement

Coronavirus Updates: घर, आॅफिसमधील एसी बंद ठेवा, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची सूचना

कोरोनाचा व्हायरस हा थंड वातावरणात जास्त काळ राहात असल्याने घरातील आणि आॅफिसमधील एसी बंद ठेवण्यात यावेत, असं आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यादृष्टीने खबरदारी घेण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रकही काढल्याचं टोपे म्हणाले.

Coronavirus Updates: घर, आॅफिसमधील एसी बंद ठेवा, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची सूचना
SHARES

कोरोना व्हायरसचा ( coronavirus) फैलाव होऊ नये म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी जनतेला मोलाची सूचना केली आहे. कोरोनाचा व्हायरस हा थंड वातावरणात जास्त काळ राहात असल्याने घरातील आणि आॅफिसमधील एसी बंद ठेवण्यात यावेत, असं आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यादृष्टीने खबरदारी घेण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रकही काढल्याचं टोपे म्हणाले.

हेही वाचा - Coronavirus Updates: कोरोनाचे नवीन 11 रुग्ण आढळले, एकूण आकडा 63 वर

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना कोरोनाबाधीतांची माहिती दिली. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाची सूचना जनतेला केली. ते म्हणाले, कोरोनाचा व्हायरस (COVID-19) थंड वातावरणात जास्त काळ राहतो म्हणून जनतेने आपापल्या घरातील एअर कंडिशन बंद ठेवावेत. तसंच खासगी आणि शासकीय (home and office) एअर कंडिशन (air condationrr) बंद करण्याचं आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयात एसी वापरू नये, जमल्यास कमीत कमी वापरावा, यासंबंधी निर्देश देणारं परिपत्रक राज्य सरकारने काढलं आहे. 

उष्ण वातावरणात हा विषाणू फार काळ टिकत नाही. तर थंड वातावरणात जास्त काळ टिकतो. त्यामुळे त्याचा फैला होऊ शकतो. तसं होऊ नये म्हणून सर्वांनी मिळून आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. तसं केल्यास कोरोनाचा विषाणू जास्त काळ टिकणार नाही, अशी अपेक्षाही राजेश टोपे यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - Coronavirus: परतणाऱ्या २५ हजार प्रवाशांसाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

राज्यातील कोरोनाबाधीतांची (coronavirus patient) संख्या ५२ वरून ६३ वर गेली आहे. त्यातील १० रुग्ण हे मुंबईतील आणि १ रुग्ण पुण्यातील आहे. कोरोनाची लागण झाली, तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण यातील काही मोजकेच रुग्ण अतिगंभीर अवस्थेपर्यंत जातात. ८० टक्के रुग्णांना फारसा धोका नसून या आजाराचे रुग्ण बरेही होतात. खासकरून ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, असे व्यक्ती, वयोवृद्ध, आजारी आणि लहान मुलांनी जास्त काळजी घेणं आवश्यक असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.   

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा