Advertisement

Coronavirus: परतणाऱ्या २५ हजार प्रवाशांसाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० ते २५ हजार प्रवासी उतरतील, या सर्व प्रवाशांचं क्वारंटाईन करावं लागेल किंवा कोरोनाग्रस्तांवर उपचार करावे लागवतील, त्यासाठी उपाय शोधण्याची गरज असल्याची विनंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली.

Coronavirus: परतणाऱ्या २५ हजार प्रवाशांसाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती
SHARES

येत्या २२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा (international flights) बंद करण्यात येणार तोपर्यंत देशात आणि प्रामुख्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (mumbai international airport) २० ते २५ हजार प्रवासी उतरतील, या सर्व प्रवाशांचं क्वारंटाईन करावं लागेल किंवा कोरोनाग्रस्तांवर (coronavirus) उपचार करावे लागवतील, त्यासाठी उपाय शोधण्याची गरज असल्याची विनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना केली.  

हेही वाचा - Coronavirus Updates: कोरोनाचे नवीन 11 रुग्ण आढळले, एकूण आकडा 63 वर 

देशभर पसरलेल्या कोरोना व्हायरसला (COVID-19) रोखण्यासाठी राज्य सरकार कुठल्या उपाययोजना करत आहेत, याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ काॅन्सफरन्सिंगद्वारे (vodeo conference) प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याशी शुक्रवारी रात्री संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना सर्वात आधी बोलण्याची संधी दिली. 

त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सद्यस्थितीची माहिती पंतप्रधानांना करून दिली. ते म्हणाले की, कोरोना या साथीच्या आजाराचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करत आहे. पण वाढत्या रुग्णसंख्येकडे बघता राज्यात चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने आवश्यक ते निर्णय घेण्याची विनंती, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली. 

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. परंतु पुढील काळात क्वारंटाईनसाठी (quarantine) अधिक सुविधा लागतील. औषधे, व्हेंटिलेटर्स तसंच उपचारांसाठी रूग्णालयांची गरज भासेल. यासाठी लष्करी रूग्णालयांची प्रसंगी मदत घ्यावी लागेल, याविषयी उपाययोजना करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

हेही वाचा - Coronavirus Updates: कस्तुरबात घुशी-मांजरी?, हायकोर्टात विनंती अर्ज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा