Advertisement

चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, प्रभागीय लॉकडाऊन होण्याची शक्यता

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी “स्थानिक लॉकडाउन उपाय” लागू करण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, प्रभागीय लॉकडाऊन होण्याची शक्यता
SHARES

मुंबईच्या M-west प्रभागात कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे M-west मधल्या स्थानिक वॉर्ड कार्यालयानं सोमवारी प्रभागातील सोसायट्यांना नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

तसंच फेरीवाल्यांची कोविड चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी “स्थानिक लॉकडाउन उपाय” लागू करण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

गेल्या आठवड्यात केवळ M-west  प्रभागात सुमारे १५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता हा आकडा २५ वर गेला असून. रोज इतकेच रुग्ण परिसरात आढळत आहेत. त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे देखील आहे की चेंबूरलाही व्यापून टाकणाऱ्या या प्रभागात निवासी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.

एम-वेस्ट प्रभागाचा विकास दर सध्या ०.२८ टक्के आहे जो मुंबईच्या सरासरी विकास दरापेक्षा ०.१४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. प्रभाग अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या भागातील वाढीचे कारण म्हणजे अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत आहेत.

हे लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिके(BMC)नं प्रभागातील निवासी संस्थांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पालिकेनं पाच मूलभूत मार्गदर्शक सूचनांची यादी केली आहे. रहिवाशांना नियमांचं अधिक कडकपणे पालन करण्यास सांगितलं गेलं आहे. पालिकेनं COVID 19 रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या इमारती आणि सोसायट्या सील करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे.

एम-वेस्ट प्रभागचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज चौहान म्हणाले, “आम्ही घर-घर सर्वेक्षणही सुरू केलं आहे. आमच्यात गटातील संसर्गाचे प्रकार घडत आहेत ज्यात एकाच कुटुंबातील सात-आठ जणांनी विषाणूची सकारात्मक चाचणी केली आहे. सुरक्षा नियमांचे पालन करणे ही जनतेची जबाबदारी आहे.”

“विवाहसोहळा आणि कौटुंबिक कार्ये सुपर स्प्रेडर इव्हेंटमध्ये बदलत आहेत,” ते पुढे म्हणाले. प्रभागात नवीन लॉकडाउन अस्तित्त्वात येण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. पण अंतिम निर्णय पालिकेला घ्यावा लागेल.

अतिरिक्त नगरपालिका आयुक्त या विषयावर विचार करून या आठवड्यात अंतिम निर्णय घेतली, असं सांगत प्रभाग अधिकाऱ्यानं या प्रदेशातील वृद्धांना लवकरात लवकर लसी देण्याची शिफारस केली आहे.

१४ फेब्रुवारीपासून या भागातील फेरीवाले आणि दुकानदारांची चाचपणी सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी (एमओएच), एम-वेस्ट, डॉ. भूपेंद्र पाटील म्हणाले, “ज्या ठिकाणी अधिक नागरिक जातात तिथं आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. खाऊगल्ली आणि भाजी विक्रेते, फेरीवाले यांच्या चाचण्या घेत आहोत.”

मुंबईतील वाढत्या घटनांचे स्पष्टीकरण देताना पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी म्हणाले की, “दररोज आम्ही १५ हजार पेक्षा जास्त चाचण्या घेत आहोत. ज्यामुळे जास्तीत जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. सर्व सामान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू करणं हे देखील रुग्ण वाढण्यामागील कारण असू शकतं. परंतु तसं सांगणं फार घाई केल्यासारखं होईल. आम्हाला मूल्यमापन करण्यासाठी अजून एक आठवडा थांबावं लागेल.”



हेही वाचा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, महाराष्ट्रानं केरळलाही मागं टाकलं

सीरमची लस वापरण्यास जगभरात परवानगी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा