Advertisement

नाहीतर आपण लाॅकडाऊनच्या दिशेने जाऊ- महापौर

महापालिकेने चेंबूरमधील काही सोसायट्यांना नोटीसा पाठवत कोरोना संदर्भातील नियमांचं काटेकाेर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

नाहीतर आपण लाॅकडाऊनच्या दिशेने जाऊ- महापौर
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंतेचीच बाब आहे. बहुतांश लोक मास्कविना लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकांनी खबरदारी घ्यायला हवी, नाहीतर आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे जाऊ. लाॅकडाऊन लागू करायचा की, नाही? हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या बाबतीत मुंबईकरांमधील हलगर्जीपणामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. परिणामी महापालिकेला पुन्हा कडक भूमिका घ्यावी लागत आहे. यानुसार महापालिकेने चेंबूरमधील काही सोसायट्यांना नोटीसा पाठवत कोरोना संदर्भातील नियमांचं काटेकाेर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती आणि सोसायटींना सील करत असल्याची माहिती देखील दिली आहे.

मुंबईत सोमवारी ४९३ नवीन कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांची नोंद झाली, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण ५ टक्के झाल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. त्यातच चेंबूरमध्ये दिवसाला २५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून रुग्णवाढीचा दर दिवसाला ०.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. या आधी याच परिसरात १५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. त्यामुळे चेंबूरमधील महापालिकेच्या (bmc) एम-पश्चिम वॉर्डकडून सोसायटी आणि फेरीवाल्यांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इमारतीतील रहिवाशांकडून मास्क आणि सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, महाराष्ट्रानं केरळलाही मागं टाकलं

महापालिकेकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीमध्ये 

  • घरकाम करणारे, दूधवाला यांच्यासहित इमारतीत बाहेरील कोणत्याही व्यक्तीला परवानगी देऊन नका
  • थर्मल स्क्रिनिंगसारख्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करा, कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास कुटुंबाने १४ दिवस अलगीकरणात राहण अनिवार्य
  • हाय-रिस्क असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करणं अनिवार्य
  • सोसायटीमध्ये लक्षणं असणाऱ्यांचीही चाचणी बंधनकारक, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांना सुनावलं होतं. एवढंच नाही तर आवश्यकता भासल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं सांगत लाॅकडाऊनबाबतचा इशार दिला होता.

(bmc take strict action after coronavirus patient increase in chembur mumbai)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा