23 नोव्हेंबरला केमिस्टचा देशव्यापी संप

 Pali Hill
23 नोव्हेंबरला केमिस्टचा देशव्यापी संप

मुंबई – ऑनलाइन औषधविक्री विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने 23 नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक दिलीये. या संपात देशभरातले 8 लाख केमिस्ट सहभागी होणार आहेत. यात मुंबईतल्या सुमारे 10 हजार केमिस्टचा समावेश असेल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली. ऑनलाइन औषविक्रीवर बंदी असतानाही औषधांची राजरोस ऑनलाईन विक्री सुरू असून औषधविक्री कंपन्यांकडून त्याच्या जाहिरातीही जोरात सुरू आहेत. या विरोधात धोरण ठरवण्याचं केंद्रानं जाहीर केलंय. पण ते धोरण प्रत्यक्षात आलेलं नाही. त्यामुळे असोसिएशनने ऑनलाईन औषधविक्रीसह अवैध औषध विक्रीवर नियंत्रण आणावे या मागणीसाठी हा संप पुकारल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

Loading Comments