Advertisement

मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, निर्बंध कडक करण्याचा इशारा

मुंबईतील मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या चाचणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाताना उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर गर्दी पाहिली.

मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, निर्बंध कडक करण्याचा इशारा
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर (Mumbai Traffic) नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईच्या रस्त्यावरील गर्दी अशी राहिली तर कोरोनाचा सामना करण्यासाठीचे निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबईतील मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या चाचणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाताना उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर गर्दी पाहिली.

मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीच्या गर्दीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध आहेत ते अजून उठवलेले नाही. गर्दी करू नका. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही गाफील राहिलो तर आयुष्याच्या वेगाला ब्रेक लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

मेट्रो (Metro)च्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार झीशान सिद्दीकी आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी १२ हजार कोटी प्रकल्पाचा खर्च आहे. त्यापैकी, आतापर्यंत साडेपाच ते ६ हजार कोटी खर्च झाले आहेत. बीईएमएल इथं तयार झालेल्या प्रत्येक कोचसाठी सरासरी ८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सरासरी १० कोटी रुपये खर्च येतात. त्यामुळे ही स्वदेशी कोच निर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरलेली आहे.

'असा' असेल नव्या मेट्रोचा मार्ग 

मेट्रो २ए- डीएन नगर ते दहिसर 

१८.६ किमीचा मार्ग

६,४१०कोटींची तरतूद 

२०३१ पर्यंत ९ लाख प्रवासी प्रवास करतील 

मेट्रो 7- अंधेरी ते दहिसर 

१६.५ किमीचा मार्ग

६,२०८ कोटींची तरतूद 

२०३१ पर्यंत ६.७ लाख लोक प्रवास करतील

या २ मार्गांवर धावणारी मेट्रो पूर्ण भारतीय बनावटीची आहे. शिवाय, ही मेट्रो ड्रायव्हरलेस मेट्रो आहे. मुंबईच्या चारकोप डेपोमध्ये मेट्रो ७ आणि मेट्रो २एचं सध्याचं कारशेड आहे. याच ठिकाणाहून मेट्रोची पहिली फेरी केली जाईल. मुंबईत ४ ते साडेचार वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणं हे आव्हानात्मक काम होतं. विशेषत: कोविड संकट आणि लॉकडाऊनमुळं मजुरांचं स्थलांतर हे या प्रकल्पातले मुख्य अडथळे ठरले.हेही वाचा

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?

इंधन दरवाढीमुळं सर्वसामान्यांचा प्रवास होतोय महाग

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा