Advertisement

मुंबईतील घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी, पवई परिसरात गॅस गळतीच्या तक्रारी

मुंबईतील अनेक भागांतील रहिवाशांकडून शनिवार संध्याकाळपासून गॅस गळतीच्या तक्रारी येत आहेत.न

मुंबईतील घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी, पवई परिसरात गॅस गळतीच्या तक्रारी
SHARES

मुंबईतील अनेक भागांतील रहिवाशांकडून शनिवार संध्याकाळपासून गॅस गळतीच्या तक्रारी येत आहेत. घाटकोपर, मुलुंड, पवई, भांडुप आणि कांजूरमार्ग या परिसरात गॅसची दुर्गंधी पसरल्याने कुठेतरी गॅस गळती होत असल्याचा संशय रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे. खासकरून सोशल मीडियावरून महानगर गॅसकडे अनेक जणांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. (Complain Of A Possible Gas Leak From Various Parts Of Mumbai Including Ghatkopar, Mulund, Vikhroli, Powai)

महानगर गॅसला या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कंपनीकडून तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे. परंतु अद्याप तरी त्यांच्याकडूनही गॅस गळती झाल्याचं ठामपणे सांगण्यात आलेलं नाही.

या प्रकरणी अजून तरी मुंबई महापालिकेकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

घाटकोपरमधील रहिवाशांनी याआधी देखील अनेकदा गॅस गळतीच्या तक्रारी केलेल्या आहेत.

यासंदर्भातील विस्तृत माहिती लवकरच कळवण्यात येईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement