Advertisement

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी १ हजारापेक्षा नवीन कोरोना रुग्ण

मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत रोज मोठी वाढ होत आहे. गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत १ हजारपेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी १ हजारापेक्षा नवीन कोरोना रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत रोज मोठी वाढ होत आहे. गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत १ हजारपेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. बुधवारी २४ फेब्रुवारी रोजी ११६७ नवे करोना रुग्ण आढळले होते. तर गुरूवारी हा आकडा ११४५ आहे. 

गुरूवारी मुंबईत पाच रुग्णांचा मृत्यू झाला. तर ४६३ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. मुंबईत आतापर्यंत ३ लाखाहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या कोरोनाचे ८९९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा कालावधी २७३ दिवस गेला आहे. झाली होती. मात्र बुधवारी अचानक ही संख्या दुप्पटीने वाढली. मुंबईत मंगळवारी ६४३ नवीन रुग्ण आढळले होते. 

दरम्यान, मुंबईत रोज सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी जवळजवळ ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, असं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे. बुधवारी आढळलेल्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती, असं चहल यांनी सांगितलं.लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेऊ नका, असे पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा