Advertisement

मिरा-भाईंदरमधील ३० मे पर्यंतची कंटेन्मेंट झोन लिस्ट

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर शहरासाठी विशेष COVID-19 रुग्णालय बांधण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

मिरा-भाईंदरमधील ३० मे पर्यंतची कंटेन्मेंट झोन लिस्ट
SHARES

मिरा-भाईंदर महापालिका परिसरात COVID-19चे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. त्यानुसार ३० मे २०२० पर्यंत मिरा-भाईंदर (MBMC) शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ६४७ वर गेली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर शहरासाठी विशेष COVID-19 रुग्णालय बांधण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. जेणेकरून शहरातील रुग्णांवर इथंच उपचार करणं शक्य होईल. एवढंच नाही, तर सरनाईक यांनी यासंदर्भातील आराखडा देखील मुख्यमंत्र्यांना सादर केला. पावसाळा सुरू होण्याआधी शहरात विशेष कोविड रुग्णालय बांधता येईल, असा दावा त्यांनी केला. 

आपण सादर केलेल्या आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मान्यता दिली असून सर्व पायाभूत सोईंसह पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.  

 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अन्नधान्य, दूध, भाजीपाला इत्यादी दुकानांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. तरीही बहुतेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसलं. त्याचसोबत आता मिरा-भाईंदर शहराच्या महापौर जोत्स्ना हसनाळे यांनी शहरात होमिओपथिक आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचं वाटप करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या गोळ्यांचा दुष्परिणाम होत नसून रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने योग्य मार्गदर्शनाखाली या गोळ्या वाटण्यात याव्यात, असं त्यांचं म्हणणं आहे.

Here's a list of all containment zones in Mira Bhayandar as on May 30


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा