Advertisement

ठाणे जिल्ह्यात कोरोनामुक्तीमध्ये उल्हासनगर, अंबरनाथ अव्वल

ठाणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनामुक्तीमध्ये उल्हासनगर, अंबरनाथ अव्वल
SHARES

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या यादीत ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर तर राज्यात पहिल्या स्थानावर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. कोरोनामुक्तीमध्ये उल्हासनगर आणि अंबरनाथ शहर अव्वल ठरले आहेत.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ८५.७५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. उल्हासनगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ९३.५८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर अंबरनाथमधील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ८९.३० टक्के  आहे. ठाणे महापालिका कोरोनामुक्तीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर (८८.६५) टक्के आहे. बदलापूर ८८.३४ टक्के, भिवंडी ८७.९८ टक्के, केडीएमसी ८५.२८ टक्के, नवी मुंबई महापालिका ८२.२८ टक्के, मिरा भाईंदर ८२.३२ टक्के तर ठाणे ग्रामीणचा कोरोनामुक्तीचा दर सर्वात कमी ८०.९३ इतका आहे.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८८८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८४ हजार २३९ रुग्ण (८५.७5 टक्के) बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात १२ हजार ५०७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३ हजार १४२ (२.८५ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  भिवंडीमध्ये कोरोना मृत्यूचा दर सर्वाधिक ७.०३ टक्के आहे. त्या खालोखाल मिरा भाईंदर ३.३६, तर ठाण्यात ३.२० टक्के मृत्यूदर आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार,  नवी मुंबईत सर्वाधिक ३२७७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर कल्याण-डोंबिवली ३१९२, ठाणे १९४०, मिराभाईंदर १५८९, ठाणे ग्रामीण १३२५, बदलापूर ३५८, अंबरनाथ ३११, उल्हासनगर २८१, भिवंडीत १९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

मुंबईत क्वारंटाईनचे नियम बदलले, 'हा' आहे नवीन नियम

कोरोना रुग्ण बरे होण्यात ठाणे देशात दुसऱ्या क्रमांकावर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा