Advertisement

राज्यात २१ ते ३० वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण

राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वच वयोगटाला कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, २१ ते ३० वयोगटात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

राज्यात २१ ते ३० वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वच वयोगटाला कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, २१ ते ३० वयोगटात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. म्हणजे या वयोगटाला कोरोनाचा धोका अधिक असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवारी एक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, २०३ रुग्णांपैकी २१ ते ३० या वयोगटातील ४४ तरुण कोरोनाचे रुग्ण आहेत. तर ३१ ते ४० या वयोगटामधील ४३ तर ४१ ते ५० वयोगटातील ३८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

सोमवारपर्यंत राज्यात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे ८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पुणे आणि सांगलीमध्ये २५ तर नागपूरमध्ये १४ रुग्ण आहेत. वसई आणि ठाण्यात प्रत्येकी पाच तर कल्याणमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई, यवतमाळमध्ये प्रत्येकी चार तर अहमदनगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांमध्ये ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के स्त्रियांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

संसर्ग झालेल्या करोनाच्या रुग्णांमध्ये ३५ टक्के हे संसर्गित देशातून आलेले प्रवासी आहेत. तर संपर्कामध्ये आलेल्याचे प्रमाण २९ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण हे ६१ ते ७० या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे 4 टक्के आहे. तर ४१ ते ५० या वयोगटामध्ये ते २ टक्के आहे. ८१ ते ९० वर्ष वयोगटामध्ये मृत्यूचे प्रमाण १ टक्का आहे. एक ते चाळीस वर्षे वयोगटामध्ये राज्यात एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

कोरोना संसर्गाच्या २१ व्या दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. चौथ्या दिवशी एकही रुग्ण सापडला नव्हता, आठव्या दिवशी ही संख्या एक होती. तर अठराव्या दिवशी दोन रुग्ण सापडले होते. तिसऱ्या, पाचव्या, १७व्या दिवशी प्रत्येकी अकरा आणि पंधरा रुग्णांची नोंद झाली होती. २१व्या दिवशी २७ तर २२व्या दिवशी २२ रुग्णांची नोंद झाली होती.



हेही वाचा -

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनमुळं टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा