Advertisement

नवी मुंबईत रेल्वे स्थानकांबाहेर कोरोना चाचणी केंद्रे

बुधवारपासून महिलांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच सर्वांसाठी लोकल प्रवास खुला होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत रेल्वे स्थानकांबाहेर कोरोना चाचणी केंद्रे
SHARES

मुंबईत लोकल ट्रेन आता हळूहळू सर्वासाठी खुली होत आहे. याआधी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू होती. बुधवारपासून महिलांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच सर्वांसाठी लोकल प्रवास खुला होण्याची शक्यता आहे. लोकल सर्वासाठी खुली होताच नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांबाहेर कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. त्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केलं आहे.

 नवी मुंबईत रोज मुंबईतून व ठाण्यातून हजारो प्रवासी येत असतात. लोकल ट्रेन सुरू झाल्यावर येथील वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे सध्या नियंत्रणात येत असलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रत्येक रेल्वेस्थानक परिसरात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स दारावे, बेलापूर तर ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे , ऐरोली या रेल्वे स्थानकाच्या परिसरात कोरोना चाचणी केंद्र सुरू केली जाणार आहेत. या केंद्रावर ‘आरटीपीसीआर’ तसंच प्रतिजन चाचण्या करण्याची सुविधा असेल. करोनाची आटोक्यात येणारी रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध केले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. हेही वाचा -

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय? 

जी उत्तर विभागातील वरळी परिसर रुग्णसंख्येत शेवटच्या क्रमांकावरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय