Advertisement

कोरोना चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची नाही गरज

खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शन) गरज भासणार नाही.

कोरोना चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची नाही गरज
SHARES

खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शन) गरज भासणार नाही. त्यामुळे लक्षणे असलेल्या व्यक्तीला आता थेट कोरोनाची चाचणी करता येणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबतचा नवीन नियम जाहीर केला आहे.

आतापर्यंत खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी बंधनकारक होती. पण आता पालिकेच्या नव्या नियमानुसार, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेत डाॅक्टरांच्या चिट्टीटी गरज भासणार नाही.  तसंच प्रयोगशाळेपर्यत पोहोचू न शकणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर आजारांच्या व्यक्तींच्या चाचण्या घरी जाऊन करण्याची परवानगीही पालिकेने खासगी प्रयोगशाळांना दिली आहे.

कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात, खासगी प्रयोगशाळांवरील नियमही शिथिल करत चाचण्या खुल्या कराव्यात असे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत. यानुसार मुंबई महापालिकेने चाचण्या करण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल केला आहे. याबाबतची बैठक सोमवारी झाली. लवकरच सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे.

विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही घरी जाण्यापूर्वी चाचण्या केल्या जाणार आहेत. यामुळे या व्यक्तींना लक्षणे नसली तरी संसर्गाचे निदान होईल. ज्येष्ठ व्यक्ती आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर आजार असणाऱ्या व्यक्तींच्याही चाचण्या केल्या जातील. यासाठी प्रतिजन चाचण्या उपलब्ध केल्या आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.



हेही वाचा -

Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा