Advertisement

रेल्वे स्थानकाच्या परिसरात होणार लसीकरण केंद्र

देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यास सुरूवात होणार आहे. मुंबई महापालिकेने या दृ्ष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

रेल्वे स्थानकाच्या परिसरात होणार लसीकरण केंद्र
SHARES

देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यास सुरूवात होणार आहे. मुंबई महापालिकेने या दृ्ष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत लसीकरण केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. तर नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानक परिसरातही लसीकरण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. 

मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात ५६ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.  तर पालिकेच्या लसीकरण केंद्राची संख्या ३९ वरुन १०० करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

लसीकरणासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी लसींच्या साठवणुकीसाठी आवश्यक कोल्ड स्टोरेजची व्यवस्थाही वाढवण्यात येणार आहे. मुंबईत सध्या पालिकेच्या ३९, राज्य-केंद्र सरकारच्या १७ आणि खासगी ७३ अशा १२९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दररोज ४० ते ५० हजार डोस देण्यात येत आहेत. आतापर्यंत २० लाख जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. 



हेही वाचा -

रेल्वेच्या 'त्या' शूर कर्मचाऱ्याला जावा कंपनीकडून ही खास भेट

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा