Advertisement

नवी मुंबईत सोमवारी अवघ्या तीन रुग्णालयांमध्ये लसीकरण

नवी मुंबईत सोमवारी अवघ्या तीन रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण होणार आहे. इतर कोणत्याही केंद्रांवर लसीकरण सुरु असणार नाही.

नवी मुंबईत सोमवारी अवघ्या तीन रुग्णालयांमध्ये लसीकरण
SHARES

नवी मुंबईत सोमवारी अवघ्या तीन रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण होणार आहे. इतर कोणत्याही केंद्रांवर लसीकरण सुरु असणार नाही. नवी मुंबई महापालिकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

सोमवारी ३ मे रोजी महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली रूग्णालयांमध्ये ४५ वर्षापुढील नागरिकांचं लसीकरण होणार आहे. मात्र, या नागरिकांसाठी फक्त कोव्हॅक्सिन लसीकरणाचा दुसरा डोस सुरू असणार आहे. कोव्हीशील्ड लसीकरण होणार नाही. इतर कोणत्याही केंद्रांवर लसीकरण सुरु असणार नाही. तसंच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार नाही.  

दरम्यान, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणासाठी नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात विेशेष बूथ सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी १ ते सायं. ५ या वेळेत लसीकरण केलं जाणार आहे. 

पालिकेने दिवसाला १० हजार लसीकरणाचं लक्ष्य ठेवलं आहे.  दुसरीकडे खासगी रुग्णालयातील केंद्र बंद होणार असल्याने व त्या रुग्णालयातील लसीबाबतची जबाबदारी खासगी रुग्णालयाची असल्याने पालिकेने आपली केंद्र वाढवून जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणाचे सुरक्षाकवच देण्याचं लक्ष्य पालिकेने निश्चित केलं आहे. सध्या नवी मुंबईत खासगी रुग्णालयांची २१ तर पालिकेची २८ अशी एकूण ४९ लसीकरण केंद्रे . त्यामुळे या ठिकाणच्या प्रत्येक केंद्रावरील बुथ वाढवण्याबरोबरच नवीन केंद्र पालिका सुरू करणार आहे. 



हेही वाचा -

  1. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी नेरुळ रुग्णालयात विशेष लसीकरण बूथ

कोरोना रुग्णांसाठी मालाडमध्ये २२०० खाटांचं कोरोना केंद्र

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा