Advertisement

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी नेरुळ रुग्णालयात विशेष लसीकरण बूथ

रुग्णालये, आरोग्य केंद्रे अशा स्वरुपातील आरोग्य संस्थांमध्येच आवश्यक जागा, मनुष्यबळ व इतर अनुषांगिक बाबींची पूर्तता होत असल्यास लसीकरण केंद्रे स्थापन करावयाची आहेत. ३८ रुग्णालयांकडून लसीकरण केंद्र स्थापित करण्याचे अर्ज प्राप्त झाले आहे.

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी नेरुळ रुग्णालयात विशेष लसीकरण बूथ
SHARES

नवी मुंबईतील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणासाठी नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात विेशेष बूथ सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी १ ते सायं. ५ या वेळेत लसीकरण केलं जाणार आहे.

१८ ते ४४  वयोगटातील नागरिकांनी https:/selfregistration.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करणं अनिवार्य आहे. केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांचंच लसीकरण केलं जाणार आहे. माँसाहेब मिनाताई ठाकरे हे रुग्णालय नेरूळमधील सेक्टर १५ मध्ये आहे. या रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर विेशेष लसीकरण बूथ सुरू करण्यात आला आहे. 

शासन निर्देशानुसार केवळ रुग्णालये, आरोग्य केंद्रे अशा स्वरुपातील आरोग्य संस्थांमध्येच आवश्यक जागा, मनुष्यबळ व इतर अनुषांगिक बाबींची पूर्तता होत असल्यास लसीकरण केंद्रे स्थापन करावयाची आहेत. त्यामुळे १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून लसीकरण केंद्रात वाढ करण्यासाठी जास्तीत जास्त आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केंद्रे निर्माण करण्याबाबत वैद्यकीय अधिका-यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याचे आयुक्तांनी सूचित केले होते. ३८  रुग्णालयांकडून लसीकरण केंद्र स्थापित करण्याचे अर्ज प्राप्त झाले आहे.  तेथे केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक बाबींची तपासणी आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. 

सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, ऐरोली व नेरुळ अशी ३ रुग्णालये, तुर्भे माता बाल रूग्णालय, २३ नागरी आरोग्य केंद्रे व इ एस आय एस रुग्णालय वाशी येथील जंबो सेंटर अशा महानगरपालिकेच्या एकूण २८ केंद्रांवर आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे, ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्ष वयावरील नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे.

  


हेही वाचा -

कोरोना रुग्णांसाठी मालाडमध्ये २२०० खाटांचं कोरोना केंद्र

टाटा समुहाकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, 'असं' करतं काम

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा