Advertisement

कोरोना रुग्णांसाठी मालाडमध्ये २२०० खाटांचं कोरोना केंद्र

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मालाड इथं २२०० खाटांचं अद्ययावत सुसज्ज कोरोना उपचार केंद्र उभं केलं जाणार आहे.

कोरोना रुग्णांसाठी मालाडमध्ये २२०० खाटांचं कोरोना केंद्र
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मालाड इथं २२०० खाटांचं अद्ययावत सुसज्ज कोरोना उपचार केंद्र उभं केलं जाणार आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’नं निविदा जाहीर केली असून ७ तारखेला ही निविदा खुली होणार आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढल्यानं आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने मालाड येथील कोरोना केंद्र उभारणीचे काम ‘एमएमआरडीए’कडे दिले आहे.

मालाड येथील कोरोना केंद्रासाठी महापालिकेनं ६५ कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र अद्याप निविदा अंतिम होणं बाकी असल्यानं खर्चाची रक्कम निश्चित झाली नसल्याचं समजतं. एमएमआरडीने निविदा प्रक्रीया सुरू केली आहे. मालाड येथील २२०० खाटांचे करोना उपचार केंद्र उभारले जाणार आहे. यातील १४०० खाटा या प्राणवायूसह असतील. तर ६०० खाटा सामान्य रुग्णांसाठी असतील. अतिदक्षता (आयसीयू) खाटांची संख्या २०० इतकी असणार आहे. त्याचबरोबर या केंद्रावर १८ डायलिसिस युनिट, पॅथालॉजी लॅब, सिटी स्कॅन यंत्रणा, कोविड चाचणी मशिन आदी अद्यावत सामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मालाड येथील कोरोना उपचार केंद्र उभारण्यात येणाऱ्या मैदानात पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे या ठिकाणी भराव टाकून जमीन समतल केली जाणार आहे.  ही जमीन खासगी मालकीची असल्याने ‘एमएमआरडीए’ने पालिकेला भराव टाकण्यास सांगितले आहे. पालिकेने हे काम सुरू केले असून भराव टाकून मैदानाचा ताबा ‘एमएमआरडीए’कडे सोपविल्यानंतर १५ ते २० दिवसांत करोना केंद्र उभारून देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्यावर्षी आपत्कालीन परिस्थितीत एमएमआरडीएने जलदगतीने बीकेसी येथील करोना केंद्र उभे केले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा