Advertisement

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर, अडीच कोटी नागरिकांचं लसीकरण

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र (Maharashtra) सुरूवातीपासून देशात आघाडीवर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर, अडीच कोटी नागरिकांचं लसीकरण
SHARES

कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) देण्यात देशात महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर आहे. राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. 

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र (Maharashtra) सुरूवातीपासून देशात आघाडीवर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश (uttar pradesh) आणि गुजरातचा (gujrat) क्रमांक लागतो. आतापर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 

उत्तर प्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये हा आकडा १ कोटी ९१ लाख ८८ हजार आहे. राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

भारतात आतापर्यंत २३.६२ कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत १८-४४ वयोगटातील ३.०४ कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर ४५ वर्षांवरील १३.२९ कोटी व्यक्तींना लसीची पहिला डोस देण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुतनिक-व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत. तसेच लसीवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णयही केंद्राने घेतला घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर निश्चित केले आहेत. या निर्णयानुसार कोव्हिशिल्ड या लसीची किंमत प्रतिडोस ७८० रुपये असेल. तर कोव्हॅक्सिन या लसीचा दर हा प्रतिडोस १४१० एवढा असेल. स्पुतनिक-V या लसीचा दर प्रतिडोस ११४५ रुपये असेल. हे सर्व दर हे खासगी रुग्णालयांसाठी असतील.



हेही वाचा -

रेमडेसिविर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा