Advertisement

राज्यात आज ३३०७ नवे रुग्ण, तर ११४ जणांचा कोरोनाने मृत्यू

राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ३३०७ नवे रुग्ण, तर ११४ जणांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

राज्यात आज १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५९ हजार १६६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ३३०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचाः- एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ९५४ नमुन्यांपैकी १ लाख १६ हजार ७५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ८२ हजार ६९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ११४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८८ पुरुष तर २६ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७६ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या ११४ रुग्णांपैकी ८४ जणांमध्ये ( ७३.३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५६५१ झाली आहे. या ११४ मृत्यूंपैकी मुंबई ७७, मिराभाईंदर १, जळगाव ७, नंदूरबार २,मालेगाव २, पुणे ३, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड १,  लातूर २, यवतमाळ १ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचाः- कोरोनाने बळी गेलेल्या पोलिसांना ‘या’ संस्थेकडून ३ लाखांची मदत

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १५८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३४७९ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ०२६ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६९.१८  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.६८ टक्के इतके आहे. राज्यातील मृत्यू दर ४.८४ टक्के इतका आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा