Advertisement

कोरोनाने बळी गेलेल्या पोलिसांना ‘या’ संस्थेकडून ३ लाखांची मदत


कोरोनाने बळी गेलेल्या पोलिसांना ‘या’ संस्थेकडून ३ लाखांची मदत
SHARES

राज्यात कोविड -१९  चा प्रादुर्भाव वाढत असतानाही आपला जीव धोक्यात घालून पोलिस हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यात अनेक पोलिसांना ही कोरोनाची बाधा झाली. तर या महामारीने अनेकांचा जीव ही घेतला. याच पोलिसांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी  मॅनकाइंड फार्मा ही संस्था आता पुढे सर्सावली आहे. कंपनीने कोरोनाने मृत पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना ३ लाख रुपयांची देणगी जाहिर केली आहे.

देशात कोरोनाने ठिक ठिकाणी थैमान घातले असताना. नैसर्गिक आपत्तीत मॅनकाइंड फार्मा  ही देशातील प्रसिद्ध संस्था अशावेळी नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असते. कोरोनाच्या लढ्यात ही या कंपनीने ठिक ठिकाणी परवडणारी औषधे, देणगीदार व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) आणि औषधे राज्याला दिली आहेत. अशा भयानक परिस्थितीत ही नागरिकांमध्ये राहून कायदा व सुवस्थेचे काम पोलिस करत असल्याने  त्याचे करावे तितके कौतुक हे कमीच आहे. राज्यात सध्या १०३३ पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यात १२८ अधिकारी आणि ९०५ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ४५ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.  त्याचे निस्वार्थ त्याग कधीही न विसरण्यासारखेच आहे. अशा परिस्थितीत कुटुंबियांना आधार म्हणून  संस्थेकडून  साथीच्या रोगासाठी मुख्यमंत्री निधीला ५१ कोटी रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मदत म्हणून त्यांचा एका दिवसाचा पगार ही देऊ केला आहे. अलीकडेच मॅनकाइंड फार्माने ओरिसा येथील रामा साहू, बिहारची ज्योती कुमारी, मदुरै येथील सी. मोहन, पुण्यातील अक्षय कोठावा आणि सुरतच्या वंकला गावातल्या देवगानिया कुटुंबीयांना प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने मदत केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॅनकाइंड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जुनेजा म्हणाले की, “राज्यातील पोलिस योद्धांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता अभूतपूर्व संकटाशी लढण्याचे मोठे शौर्य दाखवले आहे. पोलिस हे कायम नागरिकांच्या वर्दळीत असतात. डाँक्टरांच्या आधी कोरोनाबाधीत नागरिक हे पोलिसांच्या संपर्कात पहिल्यांदा येतात. त्यामुळे त्यांना या संसर्ग रोगाचा धोका जास्त आहे.  त्यामुळे त्यांचे बलिदान हे बहुमुल्य आहे. या योध्यांना श्रद्धांजली म्हणून  संस्थेकडून ५ कोटींचा छोटा निधी दिलेला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा