Advertisement

Coronavirus : माहिती लपवणं, रुग्णालयातून पळून जाणं बेतेल जीवावर

मृत्यू झालेल्या या व्यक्तीसारखे अनेक रुग्ण माहिती लपवत आहेत, पळून जात असल्याचं देखील समोर येत आहे. असं केल्यानं तुमचा जीव तर जाईलच पण दुसऱ्यांना देखील या आजाराची लागण होईल.

Coronavirus : माहिती लपवणं, रुग्णालयातून पळून जाणं बेतेल जीवावर
SHARES

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनानं (coronavirus) भारतातही वेगानं प्रवेश केला. भारताच्या आर्थिक राजधानीतही कोरोनानं शिरकाव केला आहे. आता कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईतील (mumbai) ६३ वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला.


माहिती लपवणं धोकादायक

दुबईहून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला त्याला हिंदुजामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानं हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर्सना आपण दुबईहून आल्याचं सांगितलं नव्हतं. दुबईहून आल्याची माहिती त्यानं डॉक्टरांना उशीरा दिली. रुग्ण दुबईहून आल्याची माहिती मिळताच तसंच त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढून आल्यावर त्याला कस्तुरबामध्ये हलवण्यात आलं. कस्तुरबामध्ये त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


पळून नका, आजाराशी लढा

मृत्यू झालेल्या या व्यक्तीसारखे अनेक रुग्ण माहिती लपवत असल्याचं देखील समोर येत आहे. याशिवाय संशयित रुग्ण हॉस्पीटलमधून पळ काढत आहेत. अशा घटना वारंवार कानावर येत आहेत. पण असं करणं रुग्णासाठी आणि समाजातील इतर नागरिकांसाठी देखील धोकादायक होऊ शकतं.


भीती कारणीभूत

माहिती लपवण्यामागे किंवा हॉस्पीटलमधून पळून जाण्यामागे रुग्णांच्या मनातील भीती कारणीभूत ठरत आहे. या भीतीमुळे रुग्ण माहिती लपवत आहेत किंवा हॉस्पीटलमधून पळून जात आहेत. यामागे तीन कारण असू शकतात.


  • आपली ओळख उघड होईल, अशी भीती लोकांना वाटते. कारण अशा संशयितांवर हल्ला होण्याची किंवा आपल्याला वाळीत टाकलं तर अशी भीती असते.

  • कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुढे काय? कुटुंबापासून किती काळ दूर राहावं लागेल, याची चिंता वाटू लागते.

  • आपल्याला क्वॉरंटाईन केल्यानंतर आपल्यावर काही प्रयोग केले गेले तर? अजून उपचार नाहीत, मग क्वॉरंटाईनमध्ये ठेवून नक्की काय करणार? अशा शंका लोकांच्या मनात येत आहेत.

हे प्रश्न त्यांना खरी माहिती लपवून ठेवण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. पण रुग्णानं खरी माहिती लपवणं त्याच्या आणि इतरांच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही. अशा रुग्णांमुळे इतरांना लागण होऊ शकते.

मुंबईत मृत झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत हेच घडलं. सुरुवातीला माहिती लपवून ते हिंदुजामध्ये दाखल झाल्याचं बोललं गेलं. त्यामुळे हिंदुजामधल्या स्टाफवर कोरोना व्हायरसचं संकट उद्भवलं. दिलासादायक म्हणजे हिंदुजातल्या डॉक्टरांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या आहेत. पण सर्वांना १४ दिवस घरात राहण्याचे आदेश दिले आहेत. तर काहींना आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे.

राज्य सरकारने काही हाॅटेल्सचे रुम बुक करून ठेवले आहेत. ज्यांना सरकारच्या क्वाॅरंटाइनमध्ये राहण्याची इच्छा नाही, ते रुग्ण या हाॅटेलमध्ये पैसे खर्चून राहू शकतात. त्याचसोबत मोठ्या हाॅस्पिटलांमध्ये जिथं कोरोनावर उपचार शक्य आहे, त्या ठिकाणीही रुग्ण दाखल होऊ शकतात. 


सकारात्मक विचार करा

त्यामुळे कोरोना संदर्भातील माहिती लपवणं किंवा हॉस्पीटलमधून पळून जाणं धोकादायक असू शकतं. घाबरू नका. डॉक्टरांना खरं सांगा आणि हॉस्पीटलमध्ये व्यवस्थित उपचार घेऊन पूर्ण बरे झाल्यानंतरच बाहेर पडा. सकारात्मक विचार ठेवाल तरच या आजारावर मात कराल.     



हेही वाचा

Coronavirus : मुंबईत कोरोना व्हायरसचा पहिला बळी

मुंबईतील लोकल ट्रेन, मेट्रो बंद करणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा