Advertisement

वरळीतील ‘त्या’ रुग्णाची आदित्य ठाकरेंनी स्वत: मागितली माफी!

आदित्य ठाकरेनी या व्हिडिओची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई तर केलीच, पण गैरसोय सहन करावा लागलेल्या रुग्णाची व्यक्तिश: माफी देखील मागितली.

वरळीतील ‘त्या’ रुग्णाची आदित्य ठाकरेंनी स्वत: मागितली माफी!
SHARES

वरळीतील पोद्दार रुग्णालयातील (worli poddar hospital) गैरसोईंचा एक व्हिडिओ व्हायरल होत, वरळी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism minister Aaditya thackeray) यांच्याकडे पोहोचला. आदित्य ठाकरेनी या व्हिडिओची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई तर केलीच, पण गैरसोय सहन करावा लागलेल्या रुग्णाची व्यक्तिश: माफी देखील मागितली. यासंबंधीची माहिती आदित्य यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. 

कोरोनाबाधित (corona patient) रुग्ण आढळल्याने वरळीतील कोळीवाडा (worli koliwada) परिसर आधीच सील करण्यात आला आहे. त्यातच वरळी, प्रभादेवी भागात करोनाचे इतरही संशयित रुग्ण आढळून आल्याने त्या सर्वांना खबरदारीचा उपाय म्हणून वरळीतील पोद्दार रुग्णालयात (worli poddar hospital) क्वारंटाइन करण्यात आलं आहे. परंतु या रुग्णालयात बाथरूम, टॉयलेट अत्यंत अस्वच्छ असून जेवण आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची देखील योग्य सोय होत नसल्याने या गैरसोईंचा पाढा वाचणारा एक व्हिडिओ तेथील रुग्णांनी शूट करून तो व्हायरल केला. हा व्हिडिओ आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्वरीत या प्रकरणाची दखल घेतली.

यासंदर्भात आदित्य ठाकरे आपल्या ट्विटर हँडलवरून म्हणाले की, वरळीतील पोद्दार रुग्णालयातून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या रुग्णालयात दाखल रुग्णांची जी गैरसोय झाली होती आणि त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार होती, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

या रुग्णांना दुसरीकडे दुसरीकडे हलवण्यात आलं असून, त्यांनी तेथील सुविधेचे व्हिडिओही मला पाठवले आहेत. मी त्यांच्याशी स्वतः संपर्क साधून चूक केलेल्या व्यक्तीच्या वतीने माफी देखील मागितली. त्यांना भविष्यात कधी गरज भासल्यास संपर्क साधता यावा यासाठी मी त्यांना माझा संपर्क क्रमांक दिला आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा