Advertisement

हिच तर खरी वेळ... खासगी क्लिनिक सुरू ठेवा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

इतर आजारांनी त्रस्त रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार व्हावेत, यासाठी खासगी डॉक्टरांनी आपले हाॅस्पीटल्स, क्लिनिक सुरू ठेवावेप, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या.

हिच तर खरी वेळ... खासगी क्लिनिक सुरू ठेवा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना
SHARES

राज्यातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांचा आकडा आता १३५ वर जाऊन पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्रयत्न होत असतानाच इतर आजारांनी त्रस्त रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार व्हावेत, यासाठी खासगी डॉक्टरांनी आपले हाॅस्पीटल्स, क्लिनिक सुरू ठेवावेप, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी केल्या.

डाॅक्टर्स, नर्सचं अभिनंदन

राजेश टोपे यांनी गुरूवारी दुपारी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील कोरोनाचा (COVID-19) संकट वाढत असताना डाॅक्टर, नर्स, वाॅर्डबाॅय आणि वैद्यकीय सेवा देणारे इतर कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी दिवसरात्र सेवा देत आहेत, अशा सर्वांचं आरोग्यमंत्र्यांनी सर्वात पहिल्यांदा अभिनंदन केलं. त्यानंतर इतर वैद्यकीय सेवांच्या बाबतीत महत्त्वाचं भाष्य केलं. राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने संचारबंदी लावली आहे. तसंच काही रुग्ण कोरोनाचा संशय येताच जवळच्या क्लिनिक, हाॅस्पीटल्समध्ये धाव घेत असल्याने खासगी हाॅस्पीटल्स आणि क्लिनिक चालवणाऱ्या डाॅक्टरांनी या सेवा बंद केल्या आहे. 


हेही वाचा - Coronavirus Update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३५ वर

इतर रुग्णांचे हाल

त्यांना उद्देशून आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, एका बाजूला कोरोनाचं संकट असताना राज्यभरात ठिकठिकाणी खासगी डाॅक्टरांनी आपले क्लिनिक, हाॅस्पीटल्स बंद (private hospitals and clinics should be open) करून ठेवल्याचं मला समजलं आहे. ओपीडी बंद आहेत, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस बंद आहेत. यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल, कुणाच्या लहान मुलांना वैद्यकीय मदतीची गरज असेल, कुठे गरोदर महिला असतील, अशा सर्वांना वेळेत वैद्यकीय सुविधा मिळायला हव्यात. 

हिच तर खरी वेळ

आरोग्यसेवेत असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत रुग्णाच्या मदतीला धावून जाणं हे डाॅक्टरांचं कर्तव्य आहे. त्यामुळे मनातील भीती काढून टाकत, रुग्णांवर उपचारांसाठी राज्यभरातील खासगी डाॅक्टरांनी आपापले क्लिनिक, हाॅस्पिटल्स सुरू करावेत. मानवतेच्या भावनेतून रुग्णांवर उपचार करावेत, अशी विनंती आरोग्यमंत्र्यांनी केली.

नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याचे पोलीस महासंचालक देखील उपस्थित होते. क्लिनिक, हाॅस्पीटल्स सुरू करणाऱ्या डाॅक्टरांना पोलिसांकडून सहकार्य मिळेल, डाॅक्टरांना पोलिसांकडून पुरेसं संरक्षण दिलं जाईल. जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रमुखांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा