Advertisement

बापरे! कोरोनाची आकडेवारी 35 हजाराच्यावर, दिवसभरात 2 हजार 33 नवे रुग्ण


बापरे! कोरोनाची आकडेवारी 35 हजाराच्यावर, दिवसभरात 2 हजार 33 नवे रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 35 हजार 058 झाली असून मुंबईतही 21हजारांचा (21,355) आकडा पार केला आहे. सोमवारी 18 मे रोजी दिवसभरात 2033 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. सोबतच राज्यात रविवारी 749 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात 8437 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 25 हजार 392 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

सर्वाधिक चाचण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 82 हजार 194 नमुन्यांपैकी 2 लाख 47 हजार 103 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 35 हजार 58 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 62 हजार 242 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 18 हजार 678 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

51 मृत्यू

राज्यात 51 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी झाली असून एकूण संख्या 1249 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 23 , नवीमुंबई 8,  पुण्यात 8, औरंगाबाद, नागपूर आणि अहमदनगर 2, जळगाव 3, भिवंडी, पालघरमध्ये 1 मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 35 पुरुष तर 16 महिला आहेत. आज झालेल्या 51 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 21 रुग्ण आहेत तर 19 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 11 जण 40 वर्षांखालील आहे. या 51 रुग्णांपैकी 35 जणांमध्ये ( 68 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

  • मुंबई महानगरपालिका: 21,335 (747)
  • ठाणे: 230 (4)
  • ठाणे मनपा: 1804 (18)
  • नवी मुंबई मनपा: 1382 (22)
  • कल्याण डोंबिवली मनपा: 533 (6)
  • उल्हासनगर मनपा: 101
  • भिवंडी निजामपूर मनपा: 48 (3)
  • मीरा भाईंदर मनपा: 304 (4)
  • पालघर: 65 (3)
  • वसई विरार मनपा: 372  (11)
  • रायगड: 256 (5)
  • पनवेल मनपा: 216 (11)
  • ठाणे मंडळ एकूण: 26,646 (844)
  • नाशिक: 106
  • नाशिक मनपा: 74 (1)
  • मालेगाव मनपा: 675 (34)
  • अहमदनगर: 65 (5)
  • अहमदनगर मनपा: 19
  • धुळे: 12 (3)
  • धुळे मनपा: 71 (5)
  • जळगाव: 230 (29)
  • जळगाव मनपा: 62 (4)
  • नंदूरबार: 25 (2)
  • नाशिक मंडळ एकूण: 1341 (83)
  • पुणे: 204 (5)
  • पुणे मनपा: 3707 (196)
  • पिंपरी चिंचवड मनपा: 160 (4)
  • सोलापूर: 9 (1)
  • सोलापूर मनपा: 420 (24)
  • सातारा: 140 (2)
  • पुणे मंडळ एकूण: 4640 (232)
  • कोल्हापूर: 44 (1)
  • कोल्हापूर मनपा: 8
  • सांगली: 45
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: 8 (1)
  • सिंधुदुर्ग: 10
  • रत्नागिरी: 101 (3)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: 216 (5)
  • औरंगाबाद:16
  • औरंगाबाद मनपा: 958 (33)
  • जालना: 36
  • हिंगोली: 104
  • परभणी: 5 (1)
  • परभणी मनपा: 2
  • औरंगाबाद मंडळ एकूण: 1121(34)
  • लातूर: 47 (2)
  • लातूर मनपा: 3
  • उस्मानाबाद: 11
  • बीड: 3
  • नांदेड: 9
  • नांदेड मनपा: 69 (4)
  • लातूर मंडळ एकूण: 142 (6)
  • अकोला: 28 (1)
  • अकोला मनपा: 246 (13)
  • अमरावती: 7 (2)
  • अमरावती मनपा: 108 (12)
  • यवतमाळ: 100
  • बुलढाणा: 30 (1)
  • वाशिम: 3
  • अकोला मंडळ एकूण:  522 (29)
  • नागपूर: 2
  • नागपूर मनपा: 373(4)
  • वर्धा: 3 (1)
  • भंडारा: 3
  • गोंदिया: 1
  • चंद्रपूर: 1
  • चंद्रपूर मनपा: 4
  • गडचिरोली: ०
  • नागपूर मंडळ एकूण: 387 (5)
  • इतर राज्ये: 43 (11)
  • एकूण: 35 हजार 58 (1249)

इतकं सर्वेक्षण

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1681 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून सोमवारी एकूण 14 हजार 041 सर्वेक्षण पथकांनी काम केलं असून त्यांनी 60.47 लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा