Advertisement

मुंबईत २४ तासात आढळले ४१९ कोरोनाबाधित रुग्ण

गेल्या २४ तासांत मुंबईत (Mumbai) ४१९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत २४ तासात आढळले ४१९ कोरोनाबाधित रुग्ण
SHARES

देशभरात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मंगळवारी कोरोना (Covid -19) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत (Mumbai) ४१९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आज ५५२ नवीन रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५००० पार गेला आहे. आतापर्यंत राज्यातील रुग्णांची संख्या ५ हजार २१८ पर्यंत पोहोचली आहे.

सध्या मुंबईत इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक ३ हजार ४५१ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. मुंबईत मंगळवारी २४ तासात ४१९ रूग्ण संख्या वाढली आहे. सोमवारी मुंबईत ३ हजार ०३२ रूग्ण होते. मंगळवारी ही संख्या ३ हजार ४५१ पर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील सर्वाधित धोका असलेल्या धारावीत मंगळवारी १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या १८० पर्यंत पोहोचली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ४५१ वर असून आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी ५० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे.

मंगळवारी राज्यात ५५२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी १५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यातील ७२२ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत वाढत असली तरी दुसरीकडे आज कस्तुरबातून १०० व्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला आहे.



हेही वाचा

तूर्तास मद्यविक्री नाहीच, मुंबईत ३ मे पर्यंत बंदी कायम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा