Advertisement

गुड न्यूज! राज्यात एका दिवसात ८३८१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

आज दिवसभरात 2682 नवे रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 116 मृत्यूंची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्ण बरे झाले आहेत.

गुड न्यूज!  राज्यात एका दिवसात ८३८१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
SHARES

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 62 हजार 228 झाली आहे.  मागील तीन दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आला. तीन दिवसात 287 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आकडेवारीतून पुढे आली. त्यात एक आनंदाची बातमी म्हणजे आज दिवसभरात 8 हजार 381 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. माञ धोका अजून टळलेला नाही. आज दिवसभरात 2682 नवे रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 116 मृत्यूंची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 62 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 967 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 116 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून यात मागील दोन दिवसांच्या मृत्यूची नोंद असल्याचे सांगितले जात आहे.आज एकूण संख्या 2098  झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 77 पुरुष तर 39 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 116 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 48  रुग्ण आहेत तर 55  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 13 जण 40 वर्षांखालील आहे. या 116 रुग्णांपैकी 75 जणांमध्ये ( 65 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2098 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 46 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे 16 मे ते 26 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 70 मृत्यूंपैकी मुंबई 16, जळगाव- 14, नवी मुंबई -9, धुळे -6, मालेगाव -5 , औरंगाबाद 3, भिवंडी-3, नाशिक -3 , अमरावती -2 , कोल्हापूर -2, मीरा भाईंदर -2 , रायगड -2 , सोलापूर -2 आणि 1 मृत्यू ठाणे येथील आहे. 

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 269 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2345 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16 हजार 414 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 65.91  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा