Advertisement

कल्याण-डोंबिवलीत रुग्णवाढ दुपटीचा दर १५ दिवसांवर

जून महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, शहरात रुग्णसंख्या दुपटीचा दर १५ दिवसांवर असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

कल्याण-डोंबिवलीत रुग्णवाढ दुपटीचा दर १५ दिवसांवर
SHARES

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णसंख्या दुपटीचा दर १५ दिवसांवर आला आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. लॉकडाउन आणि निर्बंध यामुळे अडीच महिन्यात रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. 

कल्याण डोंबिवलीतील बुधवारी १३५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दोन जणांचा मृत्यू देखील झाला आहे. यामध्ये डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर इंदिरानगर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आणि कल्याण पूर्वेतील कैलास नगर येथील ६६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. केडीएमसी क्षेत्रात मागील २४ तासात १३५ नवीन रुग्णांची भर पडली असून पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २५९३ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जून महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, शहरात रुग्णसंख्या दुपटीचा दर १५ दिवसांवर असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या पाहता भविष्यात ५ हजार ७६३ रुग्णांना उपचार करता येतील इतक्या खाटा उपलब्ध करून ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. ही व्यवस्था तीन टप्प्यांत करणे अपेक्षित असून पहिल्या टप्प्यातील २३०० खाटांची व्यवस्था पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील १३०० खाटांची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. 


हेही वाचा -  

मुंबई महापालिकेला मिळणार ८५ नव्या रुग्णवाहिका

Coronavirus Updates: उबर अॅपवरून बुक करा रुग्णवाहिका




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा