Advertisement

कोरोना चाचणीचा अहवाल येणार एका तासात

आता कोरोना चाचणीचं निदान 1 तासात होणार आहे. मुंबईत प्रथमच ही सुविधा सुरू झाली आहे.

कोरोना चाचणीचा अहवाल येणार एका तासात
SHARES
धारावीमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोजच वाढत आहे. त्यामुळे वेळेत कोराना चाचणीचं निदान होणं अत्यावश्यक आहे.आता कोरोना चाचणीचं निदान 1 तासात होणार आहे. एका तासात कोरोनाचे निदान करणाऱ्या ‘काटिर्र्जबेस न्युक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्प्लीफिके शन (सीबीनॅट) यंत्रा’द्वारे चाचणी करण्याची सुविधा मंगळवारपासून शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरू झाली आहे. त्यामुळे आता या रुग्णालयात दिवसभरात ६० चाचण्या करणं शक्य होईल.

 ‘जीनएक्सपर्ट’ तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही चाचणी करण्यासाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मुंबईत प्रथमच ही सुविधा सुरू झाली आहे. क्षयरोगाच्या चाचणीसाठी हे यंत्र वापरले जाते. आरटीपीसीआर प्रणालीप्रमाणे कार्यरत असलेल्या या यंत्राचा वापरही कोरोना चाचणीसाठी करण्याची शिफारस आयसीएमआरने केली होती. त्यानंतर टिळक रुग्णालयाने यासाठी परवानगी मागितली होती.

धारावीतील अनेक रुग्ण टिळक रुग्णालयात दररोज दाखल होत आहेत. रुग्णालयात प्रयोगशाळा नसल्याने यांचे नमुने केईएममध्ये पाठवले जातात. आपत्कालीन स्थितीमध्ये शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास किंवा तातडीने अन्य उपचार देण्यासाठी रुग्णाचे निदान होणे अत्यावश्यक असते. अशा वेळी कमी वेळेत निदान करणारे सीबीनॅट यंत्र नक्कीच फायदेशीर असल्याचे टिळक रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता बावेजा यांनी सांगितले.

क्षयरोगाच्या चाचण्यांसाठी अनेक ठिकाणी सीबीनॅट यंत्र उपलब्ध आहेत. यासाठी केंद्राकडून दहा हजार काटिर्र्ज राज्य सरकारला प्राप्त झाले आहे. तेव्हा आरटीपीसीआर उपलब्ध नसलेल्या परंतु सीबीनॅट यंत्र उपलब्ध असलेल्या जिल्हा रुग्णालयांनी आयसीएमआरकडे चाचणी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल करण्याचेही आदेश दिलेले आहेत.


हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा