Advertisement

भारतीय कंपनीकडून कोरोनाची अँटीबॉडी किट तयार

कंपनीनं कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी किट तयार केली आहे.

भारतीय कंपनीकडून कोरोनाची अँटीबॉडी किट तयार
SHARES

भारतसह जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १००० च्या वर गेला आहे. सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळले आहे. आतापर्यंत १० च्या वर कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या लसीवर जगभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. यातच आता भारताच्या एचएलएल लाइफकेअर लिमिटेडला मोठे यश मिळालं आहे.


अँटीबॉडी किट तयार

कंपनीनं कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी किट तयार केली आहे. या किटला एनआयव्हीकडून देखील हिरवा कंदील मिळाला आहे. या किटच्या वापरास परवानगी मिळाली आहे. या किटच्या मदतीनं रुग्णाच्या सीरम, प्लाज्मा आणि रक्ताची अँटीबॉडी चाचणी करण्यात येईल. एचएलएल लाइफकेअर लिमिटेड हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयांतर्गत काम करते.


किट कसं काम करतं?

अँटीबॉडी रक्त चाचणी किटमध्ये सर्वसाधारणपणे रुग्णाच्या रक्ताचे नमूने घेतले जातात. या चाचणीत रक्ताच्या नमून्यांचा रिझल्ट १५ ते २० मिनिटात येतो. यासाठी रुग्णाच्या बोटातून सुईद्वारे रक्ताचे नमूने घेतले जातात. याद्वारे समजते की संशयिताच्या रुग्णात कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी काम करत आहे की नाही.


किट कशासाठी फायदेशीर?

ज्या लोकांमध्ये सुरूवातीला कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, अशांसाठी ही चाचणी महत्त्वाची ठरेल. मात्र कोरोनाची लागण झाली आहे की नाही? हे रॅपिड अँटीबॉडी रक्त चाचणी किट सांगत नाही. याद्वारे कोणत्या भागात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, हे समजते.

जर रुग्णाची रॅपिड अँटीबॉडी रक्त चाचणी नेगेटिव्ह आली तर त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. आरटी-पीसीआर चाचणी पॉजिटिव्ह असल्यास रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेऊन उपचार केले जातात. सोबतच त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला जातो.


मुंबईत रुग्णांचा आकडा अधिक

दरम्यान राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 590 वर गेली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने कडक पाऊल उचललं आहे. घराबाहेर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं महापालिकेने बंधनकारक केलं आहे.


मास्क बंधनकारक

मास्क नसेल तर पोलीस तुम्हाला अटकही करू शकतात. मास्क न वापरल्यास भा.दं.वि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहेत. तसा नियमच महापालिकेने केला आहे. याबाबतचं पत्रकही पालिकेने काढलं आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. हा मास्क १ पदरी पाहिजे. तो घरी तयार केलेला असला तरी चालणार आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे.



हेही वाचा

'या' 11 रुग्णांमुळे 113 लोकांना झाला कोरोना

कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी सुरक्षा कक्ष

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा