Advertisement

'या' 11 रुग्णांमुळे 113 लोकांना झाला कोरोना

11 रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग त्यांच्या कुटुंबीयांमध्ये, नातेवाईकांमध्ये तसंच शेजारी पसरला आणि त्यांच्यामुळे इतर लोकांपर्यंत वेगानं वाढत गेला आहे.

'या' 11 रुग्णांमुळे 113 लोकांना झाला कोरोना
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता 590 झाली आहे. दक्षिण मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण  जी-साऊथ वॉर्डमध्ये सापडले आहेत. जी-साऊथ वॉर्डमधील 113 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे सुरूवातीच्या 11 रुग्णांमुळे मुंबईत कोरोनाचा वेगाने फैलाव झाला. ह्या 11 रुग्णांमुळे कोरोना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये, नातेवाईकांमध्ये तसंच शेजारी पसरला आणि त्यांच्यामुळे इतर लोकांपर्यंत संसर्ग वेगानं वाढत गेला आहे.

केस 1

वरळी बीडीडी चाळीतील पोलीस कर्मचाऱ्याचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोना झाला. त्याच्यापासून आणखी दोघांना संसर्ग झाला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हा पोलीस कर्मचारी लोणावळ्याला गेला होता. तो त्याच्या भावााच्या अंत्यसंस्कारातही सहभागी झाला होता. या दोन्हीपैकी एका ठिकाणी संसर्ग झाल्याची शक्यता आहे.

केस 2

प्रभादेवीच्या एका चाळीत राहणारी 65 वर्षीय महिला जेवण देण्याचं काम करत होती. तिला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तिचा 26 मार्चला मृत्यू झाला. या महिलेमुळे कुटुंबीय, शेजारचे लोक अशा 12 जणांना कोरोनाची लागण झाली.

केस 3

ट्रॉम्बे सेक्टरमध्ये शेफचं काम करणाऱ्या एका व्यक्तीचा रिपोर्ट मार्च शेवटच्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला. त्याच्यामुळे 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. 

केस 4

दक्षिण मुंबईतील एका डॉक्टरच्या क्लिनीकमध्ये टेक्निशियनचं काम करणाऱ्या वरळी कोळीवाडातील तरुणाला कोरोनाची लागण झाली. याच क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकालाही लागण आहे.  त्याच्यामुळे आणखी तीन लोकांना कोरोना झाला.

केस 5

मार्चच्या पहिल्या आठवड्यात ओमानहून एक व्यक्ती परतला होता. हा व्यक्ती वरळी कोळीवाडा इथला रहिवासी आहे. दोन चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर त्याची तिसरी चाचणी पाॅझिटीव्ह आली. ही व्यक्ती ज्यांना भेटला त्यांचा शोध सुरू आहे. त्याच्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. 

केस 6

वरळीच्या जिजामाता नगरमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या  महिलेमुळे 10 जणांना संसर्ग झाला आहे. सर्वात जास्त कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या या परिसरात जास्त आहे.

केस 7

लोअर परळ येथे राहणारा एक ज्येष्ठ नागरिक नुकताच स्पेनवरून आला होता. मुंबईत आल्यावर त्याने स्वत:ला होम क्वॉरंटाइन केलं होतं. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. स्पेनमध्येच तो करोनाग्रस्ताच्या संपर्कात आला असावा असं बोललं जातंय. 

केस 8

जीजामाता परिसरात सफाई कर्मचाऱ्याला 4 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून कुटुंबीय आणि आजूबाजूच्या परिसरातील 4 जणांना संसर्ग झाला.

केस 9

मुंबईतील एका रुग्णालयात आचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.  या व्यक्तीमुळे जीजामाता नगर परिसरातील 2 जणांना कोरोनाची लागण झाली.

केस 10

वरळीच्या आदर्शनगरमध्ये राहणारा एकाला कोरोना झाला. मुलुंडच्या एका खासगी रुग्णालयात तो काम करत होता. त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबातील एका सदस्यालाही लागण झाली.

 केस 11

 वरळीच्या आदर्श नगरमध्ये क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टर आणि दोन नर्सलाही कोरोनाची लागण झाली. या डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये संक्रमण झालं असेल त्यामुळे त्याचे कर्मचारीही संक्रमित झाले असावेत असा अंदाज आहे. 


हेही वाचा -

संपूर्ण धारावी केली सील, 2 नवे रूग्ण आढळले

भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा