Advertisement

मृतदेह ठेवण्यासाठी मुंबईत मोबाइल शववाहिन्या

कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास शवगृहात जागाही आता उपलब्ध होत नाही. त्यामुळे पालिकेने आता तात्पुरत्या मोबाइल शववाहिन्यांचा वापर करण्याचं ठरवले आहे.

मृतदेह ठेवण्यासाठी मुंबईत मोबाइल शववाहिन्या
SHARES

मुंबई कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मृतांची संख्याही रोज वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांतील शवगृहे भरून गेली आहेत. कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास शवगृहात जागाही आता उपलब्ध होत नाही. त्यामुळे पालिकेने आता तात्पुरत्या मोबाइल शववाहिन्यांचा वापर करण्याचं ठरवले आहे. या वाहिन्यांमध्ये मृतदेह ठेवून जागा मिळाल्यानंतर मृतदेह संबंधितांकडे सोपवला जाणार आहे. मुंबईतील १५ स्मशानभूमीत या मोबाइल शववाहिन्या ठेवल्या जाणार आहेत,

मुंबईत आतापर्यंत दीड हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या रुग्णालयातील शवगृहात जागा उपलब्ध नसल्याने काही तास मृतदेह वॉर्डमध्येच ठेवत असल्याचं उघडकीस आल्यानंतर पालिकेवर जोरदार टीका झाली. मुंबईत रुग्णवाहिकांची मोठी कमतरता भासत आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानभूमीत पाठवण्यासाठी वेळीच रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होत नाहीत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठीही खूप वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक तास वाट बघावी लागते आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी मुंबईतील १५ स्मशानभूमीत या मोबाइल शववाहिन्या ठेवल्या जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. रुग्णांचे निधन झाल्यानंतर अर्ध्या तासात मृतदेह शववाहिनीकडे दिला जाणार असून, १२ तासांत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा