Advertisement

कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यानं SEBI चं ऑफिस बंद

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात SEBI मध्ये (Securities and Exchange Board of India) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.

कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यानं SEBI चं ऑफिस बंद
SHARES

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात SEBI मध्ये (Securities and Exchange Board of India) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच कारणामुळे सेबीचे मुख्यालय १० मे पर्यंत बंद राहणार आहे.

सेबीमध्ये मॅनेजर पदावर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सेबीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याचा आणि घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह मॅनेजरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची सेबीकडून चौकशी करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

सेबीनं जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितलं आहे की, लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सेबीकडून अत्यावश्यक असणाऱ्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं आहे. गुरूवारी संध्याकाळी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 'सेबी'नं आवश्यक पावलं उचलत त्यांच्या मुंबई स्थित वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कार्यालयाला सॅनिटाइझ केलं आहे.

लॉकडाऊनमध्ये सेबीनं स्टॉक मार्केट ट्रेडिंग घरून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याआधी गुरूवारी शेअर बाजार नियामक असणाऱ्या सेबीनं फ्रँकलिन टेंपलटन म्युच्यूअल फंडला निर्देश दिले होते की, त्यांनी लवकरात लवकर गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, ज्यांनी त्यांच्या बंद होणाऱ्या सहा डेट योजनांमध्ये गुंतवणूक केली होती. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांनी 30 कोटी गुंतवले आहेत.



हेही वाचा

वडाळा गाव संपूर्ण सील, 24 नवे रुग्ण आढळले

IIT ची कमाल, आता एकच मास्क वापरा ५० वेळा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा