Advertisement

IIT ची कमाल, आता एकच मास्क वापरा ५० वेळा

आयआयटी तर्फे असा मास्क तयार केला आहे जो पुन्हा वापरता येईल आणि त्यामुळे कोणताही धोका नाही.

IIT ची कमाल, आता एकच मास्क वापरा ५० वेळा
SHARES

कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी मास्क (Mask) वापरणं हा एक मार्ग आहे. मात्र एकच मास्क पुन्हा वापरता येत नाही. वारंवार तोच वापरणंही धोकादायक आहे. शक्यतो वापरलेला मास्क पुन्हा वापरू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरीही काहीजण तसं करतात. प्रत्येक वेळी नवीन मास्क घेऊन वापरणं तसं खर्चीकच आहे. शिवाय या वापरलेल्या मास्कची व्हिलेवाट कशी लावावी? हा देखील एक मोठाच प्रश्न आहे.

मात्र आता आयआयटी दिल्लीनं यावर एक उपाय शोधला आहे. आयआयटी दिल्लीनं असा मास्क तयार केला आहे जो पुन्हा वापरता येईल आणि त्यामुळे कोणताही धोका नाही. आयआयटी दिल्लीनं NSafe हे अँटीमायक्रोबिअल मास्क तयार केलं आहे. जो धुवून ५० वेळा वापरता येऊ शकतो. अशा २ मास्कची किंमत फक्त २९९ रुपये आहे. तर ४ मास्कची किंमत ५९८ रुपये आहे.

दिल्ली आयआयटीनं बनवलेला हा मास्क ९९ टक्के सुरक्षित आहे. शिवाय तो तोंडावर लावल्यानंतर श्वास घेण्यासही कोणताच त्रास होत नाही. हा मास्क तयार करणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ. मंगला जोशी यांनी सांगितलं की, "हा सुतीपासून तयार करण्यात आलेला भारतातील पहिला मायक्रोबेरिअल मास्क आहे. ज्याचा वापर पुन्हा पुन्हा करता येऊ शकतो. हा मास्क तुम्ही डिटर्जंटनं धुवून आणि उन्हात सुकवून पुन्हा वापरू शकता. याचं उत्पादन सुरू करण्यात आलं आहे"



हेही वाचा

अडकलेल्या मजुरांसाठी मेडिकल सर्टिफिकेटची अट रद्द

वडाळा गाव संपूर्ण सील, 24 नवे रुग्ण आढळले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा